Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

आदिवासी सेनेतर्फे मागण्यांसाठी मोर्चा

नाशिक रोड - केंद्र व राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात आज अखिल भारतीय आदिवासी सेनेतर्फे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नाशिक रोडला रेल्वेस्थानकापासून विभागीय महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

इगतपुरी तालुक्‍यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या प्रमाणात मोबदला मिळावा, दादर रेल्वेस्थानकाला चैत्यभूमी असे नाव द्यावे, त्र्यंबकेश्‍वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा, दारिद्य्ररेषेखालील नागरिकांच्या याद्यांमध्ये समावेश करावा, 2002 पर्यंत अतिक्रमणधारकांना कायम करावे, 2007 पर्यंतचे आदिवासी, दलित, बहुजन वर्गातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, दुर्गम भागाचे सर्वेक्षण करून पोलिस संरक्षण दिले जावे, खासगी सावकारांकडून होणारी पिळवणूक थांबवावी, आदिवासी, दलित समाजातील अल्पभूधारकांचे विविध महामंडळांकडून घेतलेले कर्ज माफ करावे, धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे, सरकारी वनखात्यावरील अतिक्रमित जमिनी या वहितीदारांच्या नावे कराव्यात, धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

आदिवासी सेना महिला विभागाच्या जिल्हाप्रमुख रंजना नवले, नंदा जोशी, सुशीला मोरे, शिवाजी शिंदे, शिवाजी वाघ, सखाराम पवार, रमेश अंदाळे, एकनाथ घारे, काशीनाथ माळी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या.

Find us on Facebook