२. कोळीभाजी -
कोळिभजीचा सण जेठ महिन्यात साजरा करतात. पाऊस पडल्या नंतर कोळिभाजी निघाली की, गावकरी एकत्र जमून वर्गणी जमा करतात. आणि मंगळवारी वाघोबाच्या स्थानाजवळ एकत्र जमून गावच्या भगता कडुन (गाव पुजारि) देवाला सेंदूर लावतात आणि कोळी भाजी ठेवतात. नंतर नारळ फोडुन कोंबडा किवा बकऱ्याचा बळि देतात. देवाला धार देवून प्रार्थना केलि जाते कि, "हे गाव देवी-वाघोबा देवा चार महिन्यांचे रात आलि आहे, आमची पोरटोर, गुरढोर. किड्या -कट्यात फिरतील ति तुझ्या ताब्यात ठेव. शेतात चांगले पिक येवू दे, रोगराई पासून गावाचे रक्षण कर. तुला येत्या मार्गशीष साथ भरुन तुझा नवस फेडु" असा सवाल करुन जमलेले गावकरी नारळ व कापलेल्या कोंबड्या, बकऱ्याचा प्रसाद करुन वाटुन खातात. तसेच गावातील पाड्या पाड्यावर , घरा घरात सर्व लोक आपापल्या कुलदेवला दिवा लावून शेतावरच्या देवाला सेंदूर लावून सर्व कुटुंबातील माणसे एकत्र बसून कोळि भाजि खाण्याचा कार्यक्रम करतात. कुटुंबातील वयस्कर व्याक्ति हातात कोळिभाजी देवून. सर्वाच्या हातावर कोळिभाजी देवून, सर्वाना उदेशून म्हणतो, चार महिन्याची रात आलेली आहे, कोणि भांडण तंटा करु नका. शेतिचि चांगली लागवड करा. सुख दुखाला एक मेकांना मदत करा. असा बजावतात आता सगली कोळी खा असा सर्वाना आदेश देतो.
वडील व्यक्तिचा अदेश होताच बाया सर्व मंडळी पाया पडतात, भेटतात आणि सार्वजन कोळी भाजी खातात. वयस्कर स्त्रि-पुरुष दारु पितात व एकत्र बसून जेवन करतात. जेवन झल्यावर कामड नाच सुरु करतात. या दिवसा कामडि नचाला सुरुवात होते. या कोळिच्या सणाला नवीन लग्न करुन दिलेल्या मुलीना व जावयांना खास मुळ (आमंत्रण) करुन बोलावले जाते. अशा प्रकारे कोळी सण साजरा केला जातो.