आयुश विषयी काही |
आयुश म्हणजे आदिवासी तरुणांनी एकत्र येऊन आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासोबत, आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या सामाजिक यशासाठी आणि सामाजिक जाणीवा करून देण्यासाठी उभारलॆलॆ एक हक्काचॆ मुक्तव्यासपीठ आहॆ. जिथॆ तुम्ही तुमच्या विचारांची मुक्तहस्तानॆ दॆवाणघॆवाण करु शकता अन आपल्याकडॆ असलॆल्या कौशल्यांचा उपयोग आपल्या समाजासाठी कसा करता यॆईल याचा तपशील मांडु शकता. |
आपले ध्येय |
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणारे वैयक्तिक, समुह किंवा संस्था यांना एकत्र आणून त्यांच्या मदतीने आदिवासींचा विकास करणे - वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना एकत्र आणून त्यांचे अनुभव आणि ज्ञान वाटण्या साठी ज्ञानाचे जाळे बनविणे - ज्ञानाच्या जाळ्याचा उपयोग करून ग्रामीण विद्यार्थ्यांना मदत / मार्गदर्शन करणे - ग्रामीण विद्यार्थांना व्यवसाय आणि शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि मदत करणे - आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन आयुष्यात आणि समाजोन्नती च्या कामात करून घेण्याकरीता जागरुकता निर्माण करणे - शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना सोबत आणणे आणि सध्याच्या तसेच भविष्यातील स्पर्धेची ओळख करून देणे - आदिवासी तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि भविष्यात सामोऱ्या जावा लागणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांना तयारकरणे - पारंपारिक कला आणि संस्कृती यांविषयी जागरुकता निर्माण करणे आणि सध्याच्या जीवनमाना नुसार पारंपारिक कला आणि संस्कृती ह्यांचे जतन करणॆ आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे. - जाती भेद आणि पंथ भेद रोखणे आणि अखंड आदिवासी समाजा ची एकता टिकवणे - परावलंबी पण नाहीसा करून आदिवासी तरुणांना स्वावलंबी बनविणे |
आपली दृष्टी |
आ – आदिवासी संस्कृती जपूया यु – युवकांनो एकत्र येऊया श – शक्ती एकवटून जगाशी भिडूया |
आयुश का ? |
आपल्या समाजात अनुभवी, हुशार, होतकरू असे बरेच लोक आहेत. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग आपल्या समाजातील गरजूंना करीता करुन घेण्यासाठी - आपल्या समाजातील बरेच लोक विविध शहरात राहतात, पण अशा लोकांचा गावासोबतचा संबंध तुटत चालला आहे अशा लोकांचा गावासोबत संबंध प्रस्थापित करणे तसेच ग्रामीण भागातील किंवा समाजातील समस्या सोडविण्यात त्यांना सहभागी करुन घेणे - ज्या लोकांना आपल्या समाजासाठी काही करण्याची इच्छा असते. अशा लोकांसाठी खास आदिवासी समाजासाठीचे स्वतंत्र आणि आजच्या काळा नुसार ध्येय आणि उद्देश असलेले योग्य व्यासपीठ म्हणुन काम करणे. |
आपण कसे करणार? |
- वेगवेगळ्या लोकांना जोडणे [ मेल, ब्लोग्स, संकेतस्थळे, सामाजिक जाळे, चर्चा आणि समूह, internet, sms चा उपयोग करून] - वेगवेगळ्या चर्चा आणि संवाद आयोजित करणे [ अनुभवी माणसे, विद्यार्थी, व्यावसायिक, प्रतिष्ठीत इ ] - सामाजिक, शैक्षणिक, व्यवसाय मार्गदर्शन, सांस्कृतिक तसॆच इतर अनॆक असे विविध कार्यक्रम भरवणे - जेणेकरुन अश्या कार्यक्रमांद्वारे आदिवासी तरुणांमध्यॆ आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांना आपले ध्येय पूर्ण करण्यास मदत होईल |
कोण करणार? |
- संपर्कात असलॆल्या विविध माणसांकडून आपल्या ध्येय पुर्तीसाठी मार्गदर्शन आणि सहकार्य अपेक्षित आहे ज्याचा उपयोग करुन आपण समाजविकासाच्या कामांना गती देवू शकतो - संपर्कात आलेल्या ग्रामीण भागातील तरुणांकडून विविध कार्यक्रम आयोजित करणॆ . |
संपर्कात या |
- जर आपणाला सोबत यावेसे वाटत असेल तर जरूर मेल करा - आपले ध्येय आहे सगळ्या आदिवासी पर्यंत पोहोचणे, म्हणून आणखीन लोक जोडण्यास आपले सहकार्य अपेक्षित आहे. |
चला सोबत करूयात |
- आयुश च्या कार्यात मदत/सहकार्य करू इच्छित असणाऱ्यांचे स्वागत आहे, अधिक माहिती साठी "support us " मध्ये आयुश च्या संकेत स्थळावर पहा |
AYUSH - ensuring tribal success |
www.adiyuva.in | ayush@adiyuva.in |
Online platform for Social awareness and Tribal empowerment. Let us do it together!
Pages
▼