आदिवासी युवा शक्ती (आयुश)
सन २००९-२०१० या वर्षी इ.१० वी १२ वी तील पास/नापास आदिवासी विद्यार्थ्यांकरिता
रविवार, दिनांक: २० जून २०१० सकाळ ते १०.०० ते संध्या :५.०० यावेळेत स्थान: मर मियर आश्रम, सावटा हात. ता.डहाणू जि.ठाणे येथे
अन्याय नाही सहणार , अन्याय नाही करणार ,अन्याय होऊ नाही देणार.
भारतीय आदिवासी मी …गाव माझा !…मी गावाचा !!
झिंदाबाद! ! जय आयुस !!
अशी साद घालत भविष्यातील वाटचालीसाठी बक्षिस समारंभ आणि शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमा आयोजित करून पार पाडण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर सुनील पऱ्हाड यांचे हस्ते आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून आणि प्राध्यापक श्री.चेतन गुराडे व श्री.वसंत भसरा यांचे हस्ते बिरसा मुंडा यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर सुनील पऱ्हाड यांनी केली
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर डॉक्टर सुनिल पर्हाड यांनी कार्याक्रमची प्रस्तावना केली या प्रस्तावनेत प्रेरणा सदन आयुष मंच ध्येय्य धोरण, नियम आणि उपक्रम त्याचप्रमाणे कार्यक्रमांचा आढावा मांडून या काय्क्रमामागील उद्देश व भूमिका विषय मांडला. यानंतर श्री.वसंत भसरा यांनी उद्घाटन कार्यक्रमाचा समारोप करून या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना एक मोकळीक मिळावी यासाठी मार्गदर्शनाचे सहभागी स्वरूपाविषयी त्याच प्रमाणे घ्यावयाची काळजी आपली या परिसरात वागणूक कशी असावी मार्ग दर्शनामध्ये आवश्यक बाबींची नोंद घेणे, प्रश्न विचारणे बाबत प्रोत्शाहन देवून आयुश मंच चे स्वरचित प्रेरणागीत घेवून बोलके केले. यानंतर उद्घाटन सूत्रसंचालक श्री. विजय आम्बात यांनी लागलीच प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक श्री.चेतन गुरोडे यांना प्रथम सत्रातील मार्गदर्शन करण्यास सुरवात करण्यास विनंती केल्यानुसार मार्गदर्शन सत्रास सुरवात झाली.
प्राध्यापक श्री. चेतन गुरोडे यांनी ई.१० वी १२ वी नंतर चे करिअर आणि डिप्लोमा, इतर बिझनेस लाईन प्रवेश प्रक्रिया व तयारी त्याचप्रमाणे सायन्स आणि संधी व करावयाची तयारी या संदर्भ सविस्तर मार्गदर्शन केले यानंतर प्रश्नोत्ताराच्या अवधीत विद्यार्थ्यांकडून केले गेलेल्या प्रश्नांचे उत्तर व शंकांचे नीरशन ही करण्यात आले. यामध्ये सायन्स,व व्याप्ती आणि महत्व नुसार इंग्रजीची भीती न बाळगता पेपर वाचन डिक्शनरी वाचन कायमची सवय लावून शब्द संचय वाढवणे हाच इंग्रजी सुधारण्याचा एकमेव पर्याय असून खूप सोपा असल्याचे स्व: अनुभवातून समजावून दिले.
डॉक्टर सुनील पऱ्हाड यांनी वैदकीय क्षेत्रातील संधी त्याचप्रमाणे आर्टस, कॉमर्स, क्षेत्रातील संधी याबद्दल मार्गदर्शन करून आदिवासी संस्कृती चे दर्शन आपल्या अभ्यास व अनुभवा च्या आधारे विद्यार्त्यांना घडवून दिले यामध्ये आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडांची कामगिरी योगदानाचा इतिहास, आदिवासींची जीवन पद्धती आणि आपली भूमिका यासंदर्भ मार्गदर्शन केले.यामध्ये आदिवासी संस्कृती चा महिमाचे उदाहरण देताना वस्तुस्थितीचे उदाहरण देताना ज्या महिलेचा पती मयात झाला असेल त्या महिलेचे इतर समाजातील स्थान व आदिवासी मध्ये याच महिलांना धाव्लेरी म्हणून लग्नासारख्या विधीमध्ये दिलेले मनाचे स्थान, त्याच प्रमाणे मुलींकडून हुंडा घेतला जात नाही, विधवा पुनर्विवाह हे आदिवासी मध्ये पूर्वपरंपरे पासून चालत आलेले असल्याचे त्याचप्रमाणे त्यासाठी इतर कायदे किंवा बंधने घातली जातात ती आदिवासी साठी काय आदर्श देतात? असा प्रश्न करत आदिवासींच्या सहज जीवनाचे दर्शन घडवून दिले, अश्या संस्कृतीचे वारसदार व संशोधक म्हणून मात्र आदिवासींना कुठेच स्थान नसल्याची त्याचप्रमाणे बिरसा मुंडा सारख्या क्रांतिवीरांनी ज्या विधवा पुनर्विवाहास प्रारंभ करण्यास प्रोत्शाहन दिले अश्या कितीतरी आदिवासी क्रांतिवीर व समाज सुधारकांचे इतिहासात नामोनिशान नसल्याची खंतही व्यक्त केली. गाव पातळीवरील आरोग्य, शिक्षण, व्यसनाधीनता, बलाढ्य-धन्दान्द्ग्याची अरेरावी व आदिवासींवरील अन्यायाची पार्श्व भूमी ,जमिनींचे दलाल यामुळे होणारे आदिवासींचे नुकसान, याबाबत जिवंत उदाहरण दिले ते म्हणजे आजही वाणगाव सारख्या ठिकाणी आदिवासींच्या जमिनीवरील इतरांचा ताबा व हाय कोर्टातून ऑर्डर आणूनही आजही जमीन खुली करून देण्यास अडथळे आणत असलेल्या विविध यंत्रणांचे जाळे म्हणजे आदिवासींवरील अन्यायी कारस्थानाचा कहरच आहे याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
दुपारच्या सत्रात उपस्थित विद्यार्थ्याचा परिचय करून देण्याच्या बहाण्याने व्यासपीठावर स्वत:ला येण्यास मुलांना प्रोत्साहन देण्यात आले जेणेकरून त्यांची सतेज डेअरिंग वाढण्यास हातभार लागावा हा हेतू होता. चहा व नाश्ता नंतर च्या सत्रामध्ये संस्था अध्यक्ष श्री.वसंत भसरा यांनी विद्यार्थ्यांना आर्टस, कॉमर्स,सायंस स्ट्रीम व या सर्वांचे महत्व प्रवेश प्रक्रिया व तयारी आणि संधीबद्दल शारांस रूपाने एकदा पुन्हा आठवण करून देत कॉमन कोर्सेस व संधी डिप्लोमा, एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी, डी.एड बी.एड, एम.फिल, पी.एच.डी.,नेट-सेट, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र बी.एस.डब्ल्यू, एम. एस.डब्ल्यू आणि संधी या बाबत माहिती देवून, आदिवासी विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता सतत पुढे जात राहणे त्यासोबत समाजातील इतर बांधवांना ही हात देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
येणाऱ्या काळात केवळ नोकरीच्या मागे न लागता आपणास व्यवसाय व उद्योगधनन्द्यांचे क्षेत्रात प्रकर्षाने पाउल टाकणे महत्वाचे असून गाव पातळीवरील लोहार, सुतार, किराणा दुकान, पोल्ट्री,न्हावी, बांधकाम हे कमी भांडवल व जास्त नफाचे व्यवसाय काबीज करणे गरजेचे असून त्यासाठी स्वत:वर विश्वास, मेहनत व कष्ट खेण्याची तयारी महत्वाची असल्याचे गोष्टीच्या व विविध उदाहरणांच्या सहायाने पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे शिक्षण व महत्व, क्षमता बांधणी, आत्मविश्वास बांधणी, पर्सन्यालीटी डेव्हलपमेंट या विषयांवरही प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शेवटच्या सत्रात उपस्थित सर्व विध्या विद्यार्थ्यापैकी ई.१० वी मधील टक्केवारीनुसार प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या ६ मुली व ६ मुलांना इंग्लिश टू मराठी ची डीक्शनरी एक रजिस्टर व वही पेन देवून सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर, वही, पेन चे वितरण मार्ग्दशाकांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गदर्शन व बक्षित वितरण कार्य क्रमाचा लाभ तलासरी, बोईसर, डहाणू तालुक्यातील एकूण ४५ विद्यार्थ्यानी घेतला. कार्यक्रम पार पाडण्यास प्रेरणा सदन संस्थेचे सचिव श्री.अशोक कोम, हितचिंतक कुमार.दिलीप कोम आणि त्यांचे सहकारी मित्र वर्ग यांनी मेहनत घेतली. त्याचप्रमाणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक श्री.चेतन गुरोडे व डॉक्टर सुनील पऱ्हाड यांनी अखेरपर्यंत उपस्थिती लावून आभार प्रदर्शनासह, मार्गदर्शन व सहकार्याचा भार उचलला .
धन्यवाद !