AaidvaasaI yauvaa Sa@tI [AayauSa] |
ayush@adiyuva.in I www.adiyuva.in I 9422 654 759 |
सन २००९-२०१० या वर्षी इ.१० वी १२ वीत पास/ नापास होणाऱ्याआदिवासी विद्यार्थ्यांकरिता
बक्षिस समारंभ आणि भविष्यातील वाटचालीसाठी शैक्षणिक मार्गदर्शन
प्रिय बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार, आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करण्याची क्षमता, कुवत, ताकद आणि धमक आहे, मात्र त्यासाठी योग्य वेळी योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळत नाही या अभावी कुवत असून संधीचा लाभ उठविता येत नाही व क्षमतेला अजमावण्याचं धैर्य, साहस- धाडस आपण करत नाही. अन एकदा गेलेली वेळ अन संधी पुन्हा मिळत/ येत नाही. ज्यामुळे असंख्य अडचणींना -संकटांना आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही वेळ आपल्यावर येवू नये यासाठीच आयुश ही संधी आपणास आणून देवू पाहत आहे. हि प्रत्येक वेळी भासणारी उणीव वेळीच भरून काढण्यास आपल्याच बांधवांकडून हा एक छोटासा प्रयत्न.
सदर कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे , तरी या कार्यक्रमास आपणही हक्काने सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
मार्गदर्शन : १०वी-१२वी नंतर काय? प्रवेश पद्धती, संधी आणि तयारी, कला,वाणिज्य,विज्ञान, आय.टी, अभियंता, वैद्यकीय, वकिली, कृषी, आय.टी.आय, डिप्लोमा, एम.पी.एस.सी, यु पी.एस.सी.
आयुश ध्येय व उद्दिष्टे: शैक्षणिक व स्वयंरोजगार मार्गदर्शन, सशक्त, स्वावलंबी आदिवासी पिढी, आदिवासी कला, संस्कृती-मूल्यांचे रक्षण व जतन , व्यसनमुक्ती, आदिवासींचे अधिकार व हक्क.
आजच्या काळातिल आदिवासी युवकान्च्या गरजा ओळखुन त्याना स्पर्धेच्या जगात ताठ मानेने टिकता यावे हि अपेक्षा
आयुश हे आदिवासींनी आदिवासींसाठी सुरु केलेले एक व्यासपीठ आहे.आयुस हा कोणता धर्म, जात, पंथ आणि पक्ष यांचा बांधील नसून फक्त आदिवासी मूल्यांशी प्रामाणिक असलेला मंच आहे. हो आम्हीच ती माणसे आहोत; ज्यांनी पृथ्वीवर मानवता जागवली. ह्या मानवतेच्या विचाराने प्रेरित होऊनच निस्वार्थ वृत्तीने आदिवासी युवा शक्तींनी एकत्र येवून ह्या छोट्याश्या कामाला सुरवात केलेली आहे.
आदिवासींचे जीवन म्हणजे इतरांना जनावरांप्रमाणे वाटले म्हणून जो उठतो तो आपला विकास करण्यास येतो, आदिवासी नावाला जाहिरात आणि बुजगावणे म्हणून वापरतो स्वत:च्या चांगुलपणाला गोंजारतो, स्वार्थ पुरती अन फायदा झाला की आपल्याला फेकून देतो. ही लुबाडणूक स्वातंत्र्याच्या ६१ वर्षापासून चालत येत आहे. ज्यामुळे आदिवासींची प्रचंड फसवणूक, पिळवणूक, होऊन आपणास हक्काचेही मिळू दिले जात नाही. माणूस म्हणून जगायचे असेल तर आपणास जाती-जमाती, पंथ, धर्म- पक्ष पक्ष्यांच्या दावणीला न बांधता आदिवासी म्हणून एकजुटीने या विरुद्ध सकृतीने आवाज उठविणे काळाची गरज आहे. म्हणून आज खरी गरज आहे शिकलेल्या आणि समाजाप्रती ऋण म्हणून विधायक कृती करण्यासाठी तयार असलेल्या आदिवासींची. आपल्या बुद्धीने विचार करून आदिवासींच्या मानवतेच्या महान मुल्यांची जपणूक करण्याची. म्हणून आयुश तुम्हाला साद घालतो आहे. शिका -स्वयंपूर्ण व्हा ! संघटीत व्हा आणि संघर्ष करा!
Aapalia sagalia laaoKa eko jaagoa var Aanaayacia Aahat
कार्यक्रम: रविवार, दिनांक: २० जून २०१० सकाळ १०.०० ते सांचे :५.००
ठिकाण: आशागड किवा सावटे, तालुका – डहाणु, जि. ठाणे, ४०१६०७, कार्यक्रम सम्पर्क – ८०८७५४६६७५
टीप: कार्यक्रमाला येताना १०वी आणि १२वी (पास) च्या आदिवासी विद्यार्थ्यांनी मार्कलिस्ट (गुणपत्रक) ची झेरोक्स प्रत सोबत आणावी.