उदघाटन
समारंभ : (संयुक्त
कार्यक्रम -नेतृत्व गुण शिबीर आणि आदिवासी सशक्तीकरण कार्यशाळा )
कार्यशाळेचे उदघाटन माननीय एड्वोकेट चिंतामण वानग, आमदार (व माजी खासदार) यांच्या तर्फे युवा शक्तीचे प्रतिक म्हणून मशाल प्रज्वलित करून व आदिवासी समाजाचे आराध्य दैवत कणसरी पूजन करून करण्यात आले. आदिवासी विकास प्रकल्प डहाणू आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे आभार मानून कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुश अध्यक्ष श्री सचिन सातवी (इंजिनियर व सामाजिक कार्यकर्ता) यांनी केले. उद्घाटन सोहळ्यात श्री पांडुरंग बेलकर (माजी सभापती, समाज कल्याण, जिल्हा परिषद ठाणे) व एड्वोकेट काशिनाथ चौधरी (नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य) यांनी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, युवक युवतींना आयुश सारख्या व्यासपिठाची आदिवासी समाजाला गरज असल्याचे नमूद करून आदिवासींची सद्यस्थिती, समस्या व आपली भूमिका त्याचप्रमाणे अशा प्रशिक्षणाची आवश्यकता याबाबत संबोधित केले..
उदघाटन भाषणात आमदार चिंतामण वानग यांनी आयुश च्या नाविन्य पूर्ण उपक्रमाचा तपशील देवून आयुश प्रगतीची, गती, वाटचाल व यशाबद्दल अभिनंदन केले. युवक युवतींच्या हातात संपूर्ण राष्ट्र - समाजाचे भविष्य आहे, त्या मुळे काळाच्या ओघात, योग्य दिशेने, योग्य वेळी, उचित पूल उचलणे अतिशय महत्वाचे असून. त्या साठी माहिती, ज्ञान आणि सतत कष्ट करण्याची मनाची तयारी असणे असल्याचे नमूद केले. या साठी आयुश सारखे व्यासपीठ आदिवासींच्या सार्वभौम विकासासाठी, भविष्य काळासाठी गरजेचे व आवश्यक असून, आदिवासींची एकजूट, एकशक्ती व कृतीचे प्रतिक आयुश व्हावे या साठी सुभेच्छा दिल्या.
उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री वसंत भासरा यांनी केले. सूत्र संचालन निवेदनात श्री भासरा यांनी आदिवासींची विविध नावाखाली होणाऱ्या हेलसांडीचा निषेध करून, दिनांक १/३/२०१२ रोजी मुंबईच्या बातमीत "आदिवासी नरभक्षक" असा उल्लेख करणाऱ्या स्टार माझा या वृत्त वाहिनीवर न्यायालयीन खटला का चालवू नये? असा प्रश्न करून या वाहिनीचा निषेध केला. आपल्या गावामधील आदिवासी भूमिहीन होत आहे, गावातीलच दलाल लोकांच्या संगनमताने पैशेवले, शहरातल्या बड्या व्यक्तींच्या हाती कावडीच्या किमतीत जमिनी जात आहेत. हे कुठे तरी थांबवावं, अन्यथा आपण गुलाम आणि घरगडी- सालगडी म्हणून राबण्याच संकट दूर नाही अशी भीती-खंत व्यक्त केली.
व्यासपीठावर प्राध्यापक चेतन गुरोडा (मुंबई विद्यापीठ), प्राध्यापक सुनील भुसरा ( बांदोडकर महाविद्यालय विद्यालय, ठाणे), माननीय मुरलीधर बांडे, माननीय रघुनाथ महाले, आयुश अध्यक्ष्य सचिन सातवी उपस्थित होते. या कार्यशाळेचा लाभ डहाणू, तलासरी, विक्रमगढ,वाडा, पालघर, वसई तालुक्यातील एकूण ३० ते ३५ सरपंच / सदस्य / कार्यकर्ते व ३० ते ३५ युवक युवती यांनी घेतला. उद्घाटन सत्र नंतर लागलीच मार्गदर्शन सत्राला वेळा पत्रकाप्रमाणे सुरवात झाली .
See VDO at :
1)
Leadership
Program : http://youtu.be/DCIDeD32d60
2)
Tribal
Empowerment program : http://youtu.be/cW2jzvMjZoE
See Photograph at:
1)
Leadership
program : https://plus.google.com/photos/107070737410562446083/albums/5733518930613791393
2)
Tribal
empowerment Workshop :