Pages

आदिवासींच्या विकासातील प्रगत आदिवासींची भूमिका


आदिवासींच्या विकासातील प्रगत आदिवासींची भूमिका

जंगलातील फळे, फुले, कंदमुळे आणि शिकार यावर आपली उपजीविका भागवणारा आदिवासी समाज काही प्रमाणात चाकोरीच्या बाहेर जाऊन आपले जीवन जगू लागला आहे.त्याचेच एक उदाहरण म्हणजे आज आदिवासी समाज आणि संस्कृतीचे दर्शन जगाला करून देण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. अनेक पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे, इत्यादींमधून अनेकवेळा वेगवेगळे लेख, कविता छापून येतात. त्यातच भर म्हणजे फेसबुकवर सुद्धा आदिवासी संस्कृतीशी निगडीत अनेक ग्रुप आहेत.

देशाच्या एकूण लोकसंखेच्या ८.२ % असलेला हा आदिवासी समाज एका संपन्न लोकपरंपरेचा एक भाग आहे. परंतु इंग्रजांच्या आगमनानंतर आदिवासी जमातींच्या स्वायत्त, संपन्न आणि स्वच्छंद जगण्यावर अनेक बंधने आली. स्वातंत्र्यानंतर गोर्या साहेबांच्या जागी आलेल्या देशी साहेबांनीसुद्धा आदिवासिंचे जगणे असह्य केले. परिणामी आज १० कोटींहून अधिक असलेले आदिवासी आपले स्वत्व हरवून बसले आहेत.

आधुनिकीकारानाच्या, प्रगतीच्या आणि जागतीकरनाच्या नावाखाली आजचा समाज आदिवासिंचा मूळ धर्म, संस्कृती, कला, नृत्य, वाद्य, औषधोपचार अशा सर्व मौलिक गोष्टींचा त्याग करत आहोत. मूळ आदिवासींना प्रगतीचा पुढचा टप्पा म्हणजे पांढरपेशा वर्गासारखे जीवन जगणे असे वाटते, तर अन्य समाजाला या हरवत चाललेल्या आदिवासिपणाची पर्वा नाही असे चित्र आज देशातील सर्वच आदिवासीबहुल भागात दिसतेय. देशभर विखुरलेल्या आदिवासी जमातींमध्ये होत असलेल्या या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचे परिणाम भयंकर आहेत.

आदिवासींचा विकास करताना त्यांचे आदिवासीपण जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अन्यथा न्यूझीलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, व अमेरिकेतील आदिवासी जसे म्युझियममध्येच पाहायला मिळतात, तशी अवस्था आपल्याकडेही होईल कि काय अशी भीती वाटते.

आज प्रगत आदिवासी बांधवांनी आपल्या आदिवासी लोकांना प्रेम, सम्मान, सहानुभूती, शिक्षण, मार्गदर्शन दिले केले पाहिजे. या आपल्या समाज बांधवांना आपले प्रेम, सम्मान, सहानुभूती, शिक्षण, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. जर आपण त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले तर ते खूपच आनंदी होतील. जर अशी मानाशिकाता देशातील १० करोड आदिवासींची निर्माण झाली तर हजारो वर्षापूर्वीचा सुवर्णकाळ पुन्हा यायला उशीर होणार नाही.