Pages

आदिवासी विकासाचा दृष्टीकोन

"सर्वसाधारणपणे आदिवासींचे जीवन, यांचा पूर्वेतिहास व संस्कृती यांच्या अभ्यासाची क्षेत्रे अत्यंत व्यापक आहेत. पण त्यामानाने अभ्यासाची साधने फारच मर्यादित आहेत. महाराष्ट्रातील आदिवासींच्या बाबतीत तर ही उणीव प्रकर्षाने जाणवते. केवळ ज्ञानमींमासा तृप्त करण्यासाठी नव्हे तर आदिवासी लोकांसंबंधीच्या प्रत्यक्ष माहितीच्या आधारे त्यांचा नियोजनपूर्वक विकास घडवून आणण्यासाठी व पुढील अभ्यासाला उत्तेजन देण्याच्या हेतूने आदिवासी लोकांचे जीवन, इतिहास व संस्कृती यासंबंधी अधिकाधिक उपयुक्त व भरीव माहिती मिळविणे गरजेचे आहे. तसेच उपलब्ध असणारी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे."

आदिवासी समाजाचा इतिहास गौरवशाली आहे असे आपण नेहमी म्हणतो. हे सत्य आहे...परंतु आजच्या तरुणपिढीला जर या गौरवशाली इतिहासाची जाणीव किंवा माहिती नसेल तर आपल्या जनजागृतीच्या कार्यात भविष्यात अनेक अडचणी येवू शकतात. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या जमातींची माहिती, आपल्या क्रांतीकारकांची माहिती पोहोचणे गरजेचे आहे. यातून समाज अधिक बळकट करण्यास मदत मिळेल. म्हणून सर्वांनी आपल्याकडे असणारी माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्वाचे आहे.

- Rajoo Thokal