Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

Tarpa Mahotsav 2013 @ Dahanu - Sanchita Satvi

तारपा नृत्य ,बोहाडा ,गौरी नृत्य ,ढोल तसेच डांगी नृत्य अशा विविध भागातील आदिवासी नृत्यांचा थरार!… वारली चित्रकलेने सजलेली दुकाने,आदिवासीच्या साध्या परंतु समाधानी स्वावलंबी राहणीमानाची साक्ष देणारी शेणामातीने सारवलेली झोपडी !तांदळाचे लाडू,पापड्या,सावेली,नाचणीची भाकरी तसेच कोहळ्याची भाजी यांचा सुटलेला घमघमाट! प्रचंड संख्येने उलटलेला जनसागर आणि या सर्व ऐतिहासिक क्षणाची साक्षठेवणारा डहाणूचा नयनरम्य समुद्र किनारा!
                    हे दृश्य होते डहाणू बीच ,पारनाका येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय (दि . २१डिसें २०१३ ते २३ डिसें  २०१३ ) तारपा महोत्सवाचे !
                 प्रस्तुत स्थळी जेव्हा प्रवेश केला तेव्हा प्रथम तर डोळ्यांवरती विश्वासच बसेना ,कारण हजारोंच्या  संख्येने लोटलेला जनसागर आणि त्यात घुमणारा ताराप्याचा सुर…! हे दृश्य निदान मी  तरी पहिल्यादांच पाहत होते . शाळकरी मुलांपासून ते क्लास १ ऑफिसर पर्यंत आणि शेंबड्या पोरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुणीही स्वताला या महोत्सवात सामील होण्यापासून रोखु शकले नव्हते .
                मग आमची आयुशची टीम पण मागे कशी राहणार … ?आदिवासी युवा शक्ती - आयुश ची टीम महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळीच मोठ्या उत्साहाने प्रस्तुत स्थळी हजार झाले ,मग वारली चित्रकलेची दुकाने सजवण्यापासून ते 'वारली आर्ट सेशन ' मध्ये भाग घेण्यापर्यंत टीमचा उत्साह ओसंडून वाहत होता . या वेळेत आपल्या वारली तरुण चित्रकारांनी एक नवीन ट्रेंड सुरु केला तो म्हणजे taoo गोंदवून देण्याचा! शरीरावर tatoo गोंदवणे काही नवीन नसले तरी ,या tatoo मध्ये वारली चित्रकलेतील चिन्हांचा वापर करून नवीन fashion चा शुभारंभ आमच्या वारली कलाकारांनी केला . आणि त्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
              या महोत्सवात आयुश टीमच्या सर्व वारली चित्रकारांनी आपापली चित्रकला व हस्तकलांचे प्रदर्शन भरवले होते ,हस्तकला वस्तू ,वारली चित्रकला ,बांबू आर्ट यासारख्या इविध वस्तू या प्रदर्शनात विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. आमच्या या दुकानांना या तीन दिवसात  हजारोंच्या संख्येने आलेल्या सर्व पर्यटकांनी तसेच बऱ्याच विदेशी पर्यटकांनी सुद्धा भेटी दिल्या . पर्यटकांची वारली चित्रकलेबद्दलची उत्सुकता व पसंती हि खरेच वाखाणण्याजोगी होती ,प्रत्यक्ष पेंटीग शिवाय विविध वस्तूंवर वारली कला साकारलेल्या वस्तूंकडे स्त्री वर्गाचा  कल जास्त दिसून येत होता . यामध्ये शोभेच्या वस्तू ,दागिने तसेच कपड्यांवर केलेल्या वारली कलेला खूप मागणी असल्याचे दिसून आले ,हि आपल्या कलाकारांसाठी खूप महत्वाची बाब आहे . आमच्या कलाकारांनी आलेल्या पर्यटकांना कलेबद्दलची माहिती व योग्य मार्गदर्शन करून आदिवासी कलेचा प्रसार करण्याचे उत्तम कार्य केले . .
             खरे पाहता ते तीन दिवस आम्ही खऱ्या अर्थाने 'आदिवासी 'म्हणून जगलो ,तारपा नृत्यावर मनसोक्त ठेका धरून नाचण्याचा मोह तर आम्ही कसाबसा आवरला ,परंतु मन मात्र 'भिंदोडत … भिंदोडत… 'करतच होते .
             तीनही दिवस आपल्या आदिवासी स्त्रियांनी बनवलेल्या अस्सल 'tribal food ' पुढे आजचे पिझ्झा बर्गरही कस्पटासमान वाटू लागले आहेत ,विविध भागातून आलेल्या आपल्या आदिवासी बंधुभागीनींनी सादर केलेली नृत्ये व त्यातील थरारक कसरती पाहून तर एखादा action पटसुद्धा फिक्का वाटावा !सर्व वातावरणाच जणू 'आदिवासिमय' झाले होते.  कधी नव्हे तेव्हडा उत्साह व अभिमान आदिवासींच्या डोळ्यात अवतरला होता .
              संपुर्ण जगाला आदर्श घालून देणारी व साधी परंतु स्वावलंबन शिकवणारी आदिवासी संस्कृती प्रत्यक्ष अनुभवली व आदिवासी असण्याचा अभिमान डोळ्यात अवतरला ,कारण तसे आपल्यासारख्या सुशिक्षित आणि स्वतःला mordenसमजणाऱ्या आदिवासी जनतेला हे सर्व नवीनच ,नाही का …?
              परंतु मोठ्या प्रमाणावर एकत्र जमलेल्या आदिवासी तरुणाईने घेतलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहुन आपली संस्कृती नक्कीच जपली जाईल ,अशी अशा वाटू लागली आहे .
      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सौजन्याने आयोजित या तारपा महोत्सवाचे हे प्रथम वर्ष !डहाणू परिसरात आदिवासी भागात पर्यटनाचा विकास व्हावा,व आदिवासी संस्कृतीची ओळख सर्व दहानुकारांना व्हावी हा या मागचा उद्देश ! 
      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्पाधिकारी मा. श्री. शैलेश नवाल यांच्या सुंदर कल्पनेतून साकारलेल्या या तारपा महोत्सवामुळे डहाणू परिसरात पर्यटनाचा विकास होण्यास नक्की हातभार लागेल . 
       खरेतर आम्हाला आमचीच संस्कृती अनुभवायला महोत्सवात जावे लागतेय हीच मोठी खेदाची बाब आहे . कारण आपली संस्कृती हि आपल्या दैनंदिन जीवनातुन प्रकट होत असते ,ती आपण रोज जगायला व अनुभवायला हवी ,त्यासाठी चतुर्थी व एकादशीची गरज नसते.  असे असूनही आपल्या उत्सवाचे प्रतिक समजल्या जाणारा  'तारपा नृत्य 'पाहायला आज आपल्याला u tube वर सर्च करावे लागत आहे . 

      हि परिस्थिती आपल्यासारख्या शिक्षित पिढीमुळेच  निर्माण झाली आहे . आपल्या पूर्वजांनी जपलेला सांस्कृतिक वारसा जपण्यास व तो आपल्या पुढच्या पिढीला देण्यास आपण असमर्थ ठरलो आहोत,कारण आधुनिकीकरणाच्या नावाखाली व सांस्कृतिक मुल्यांची ओळख न करून घेता ,आपण भलतीकडेच भरकटू लागलो आहोत , व यामुळेच आपल्याला आपलीच संस्कृती तुच्छ वाटू लागली आहे .
     परंतु हीच महान संस्कृती अभ्यासायला जेव्हा पांढरपेशी व विदेशी लोक येतात,तेव्हा मात्र आम्हा सुशिक्षितांना (?) प्रश्न पडतो कि, "ज्या संस्कृतीचा आदर्श आज जगात घालून दिला जातोय ती संस्कृती नाकारणारे आम्ही  खरेच सुशिक्षित आहोत का… ? हा प्रश्न पडू लागला आहे. 
         म्हणता म्हणता ते तीन दिवस संपलेही ,आणि हा तारपा महोत्सव आम्हा शिकलेल्यांना खूप काही शिकवून गेला 
    कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवता येतील यांचे उत्तम उदाहरण मा. श्री. नवाल यांनी घालून दिले. त्यांच्या या कार्याबद्दल आयुषच्या संपूर्ण टीमतर्फे अभिनंदन व खूप खूप आभार !
                    हा महोत्सव असाच चालू राहावा, असे वाटत असतानाच नाईलाजाने त्याला निरोप द्यावा लागला.परंतु येणाऱ्या तारपा महोत्सवाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय ,निदान या निमित्ताने तरी समाजापासुन भरकटत चाललेल्यांना 'आदिवासी 'असण्याचे महत्व कळेल !

Sanchita Satvi 

Find us on Facebook