Pages

आदिवासी उदयोजक विकास ,नेतृत्व शिबीर संपन्न !

आदिवासी उदयोजक विकास ,नेतृत्व शिबीर संपन्न !

आदिवासी समाजातील उद्योजक तयार व्हावेत, आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबी पणा सोबत स्पर्धात्मकता तयार करण्याची गरज लक्षात घेवून सर्वगुण संपन्न उत्कृष्ट नेतृत्व तयार व्हावे असा स्पष्ट उद्देश ठेवून आदिवासी युवा शक्ती (आयुश),आदिवासी युवा सेवा संघ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,डहाणू आणि.आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत दि. २२ ते २६ फेब्रु २०१५. सोमय्या हॉस्पिटल ,धुंदलवाडी .ता.डहाणू ,जि. पालघर येथे आदिवासी युवा उद्योजक व नेतृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर शिबीर हे ३ विभिन्न सहभागींसाठी होते. ३०निवडक युवक युवतींसाठी ५ दिवसीय निवासी,४०ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी १ दिवसीय तसेच ५० आदिवासी चित्रकारांसाठी १ दिवसीय कार्यशाळा घेण्यात आल्या. या शिबिरामध्ये आदिवासी तरुण तरुणींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. 
सदर निवासी प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थीना आदिवासी सबळीकरण, विविध शासकीय योजना व भूमिका,नेतृत्वाचे आणि उद्योजकतेचे विविध पैलु व संधी, आत्मविश्वास आणि क्षमता बांधणी, व्यक्तिमत्व विकास इ. विषयी तज्ञान्मार्फात मार्गदर्शन करण्यात आले. तरुण पिढीमध्ये सामाजिक व सांस्कृतिक जागरुकता निर्माण व्हावी तसेच त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठीही विशेष सत्रे घेण्यात आली. 

कार्यक्रमाचे उदघाटन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे. चे संचालक मा. संभाजी सरकुंडे साहेब यांच्या हस्ते झाले. त्यांनी आदिवासी उपाय योजना, सद्य स्थिती समाजा पुढील भविष्यातील आव्हाने आणि युवा पिढी कडून अपेक्षित सामाजिक सहभाग आणि सकारात्मक दृष्टीकोन या विषयी आणि कार्यशाळेचा सारांश अगदी सोप्प्या भाषेत समजावून दिला. यावेळेस सांस्कृतिक अधिकारी रमेश रघतवन आणि त्यांचा अधिकारी वर्ग उपस्तीत होते, पहिल्या दिवसाचे सूत्र संचालन आदिवासी नेतृत्व आणि शिक्षक विनोद दुमाडा यांनी केले. मनोज धांगडा, आयुश ग्रुपचे संस्थापक श्री. सचिन सातवी, वसंत भसरा, व्य.प्रशिक्षक दिलीप राठोड, श्री. राजू पांढरा, श्री पारधी साहेब, श्री. श्यामसुंदर चौधरी यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना लाभले. सांस्कृतिक आणि सामाजिक जबाबदारी या विषयी अगदी कल्पक पद्धतीने श्री संपत ठाणकर यांनी समजावून सांगितले. haptido boxing या विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रीडा प्रशिक्षक श्री. राज वाघातकार यांचे माहितीपर मार्गदर्शन विशेष प्रेरणा देणारे होते त्याशिवाय आदिवासी पेन्थर व बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष श्री प्रशांत बोडके यांचे भाषण प्रशिक्षणार्थीमध्ये उत्साह भरणारे ठरले. आदिवासी चित्रकला यांचा उपयोग करून त्वरित रोजगार सुरु करण्या करिता विविध व्यावसायिक आणि निर्यात करणाऱ्या कंपनीचे संचालक मंडळ यांनी युवा वर्गाला रोजगाराच्या संधीचा योग्य उपयोग करून संस्कृती टिकवण्याचे आव्हान केले 

निरोप समारंभ दि. २६ रोजी आयुश ग्रुपचे संयोजक श्री. वसंत भसरा यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला. ज्यामध्ये प्रशिक्षणार्थीनी या शिबिराचा मूळ उद्देश पूर्ण झाल्याचे व सकारात्मक दृष्टीकोण व आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याचे समाधान व्यक्त केले. याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थीनी स्वतःच्या प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याची हि प्रतिज्ञा केली.


Event Pics  https://www.facebook.com/media/set/?set=a.775393975847532.1073741849.122481367805466&type=1 

Read More about Event : http://www.adiyuva.in/2015/02/tribal-entrepreneurship-development.html