जोहार !
काल जग भरात आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध बातम्या, फोटो, व्हिडीओ शेयर केले जात आहेत. सगळ्यांची मेहनत, नियोजन, परिश्रम, समाजा प्रती असलेली तळमळ विविध स्वरूपात बघायला मिळते आहे. अनेकजण प्रत्येक्ष, अप्रत्येक्ष सहभागी झाले, सामाजिक विषयावर बोलू लागले, नव्याने सामाजिक उपक्रमात जोडले जाऊ लागलेत. हे आशादायी चित्र आणि *या ऊर्जेचा निरंतर सहभाग आपला स्वावलंबी, सशक्त समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, अस्मिता, स्वाभिमान, परंपरा, संस्कृती जतना साठी प्रयत्न करूया.*
*जल जंगल जमीन जीव यांचे जतन करून निसर्ग तसेच सर्व समावेशक जीवश्रुष्टी यांच्या शाश्वत विकासाची मूल्य आदिवासी संस्कारात आहेत. या विषयी संवेदना जागृत करण्यासाठी प्रत्येक पातळीवर पूरक प्रयत्न सशक्त करूया.*
समाजाचे एकात्म स्वरूप सशक्त करण्यासाठी एक स्वायत्त प्रणाली मजबुत करून, समाजाच्या भविष्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी तसेच समाजाच्या प्रत्येक समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना आणि त्यासाठी लागणारे संस्कार, मनुष्यबळ, त्याग आणि प्रामाणिकता, शिस्त, कौशल्य, कार्यपद्धती, संघटन, अर्थव्यवस्था, बौद्धिक क्षमता, नेतृत्वगुण, इत्यादी सहज तयार व्हावे या साठी आपली ऊर्जा कामी आणुया. *आपले गाव/जमात/भाषा/ग्रुप/समूह/संघटना/संस्था/राजकीय विचारसरणी/काम करण्याची पद्धती आणि स्वरूप वेग वेगळी असू शकते. पण आपल्यातली समाजा प्रती असलेली संवेदना समाज हिताचे उपक्रम आणि सकारात्मक, रचनात्मक, पूरक प्रयत्न करून एक कुटुंबी हि भावना तयार करणे हे बदलत्या परिस्थितीत मोलाची भूमिका पडू शकेल यात शंका नाही. प्रत्येकाची मेहनत, तळमळ, ऊर्जा समाज हिताच्या उपक्रमात संचयित व्हावी यासाठी प्रयत्न करूया.*
काल तलासरी येथे आदिवासी दिन निमित्त *"पर्यावरण व समाज संवर्धन परिषदेत"* सहभागी व्हायची संधी मिळाली. महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, गुजरात येथील विविध ३० संघटनांच्या वतीने येथील जल जंगल जमीन जीव या ज्वलंत अस्तित्वाच्या मुद्द्यावर एकत्रित "भूमी पुत्र बचाव" आंदोलनाची हाक दिली. नियोजन, नवीन तंत्रज्ञान, विविध संघटनांचा, युवा वर्ग, नोकरदार, शेतकरी, व्यावसायिक असे हजारो लोकांनी यात सहभाग घेऊन परिषद यशस्वी केली. या साठी *आदिवासी एकता परिषद आणि भूमिसेना यांचा पुढाकार तसेच प्रत्येक कार्यकर्त्यांची मेहनत आणि तळमळ कौतुकास्पद आहे, सगळ्यांना मानाचा जोहार!*
एकत्रित आंदोलनाचा अनुभव भविष्यासाठी अनेक गोष्टी शिकवून जातो आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी कामी येतो.
*आपल्या आपल्या परिसरात असलेले आदिवासी समाज हिताचे प्रत्येक प्रयत्न सशक्त करून आदिवासी अस्तित्व अस्मिता टिकवूया!*
*Let’s do it together!*