In Case Fonts not visible, kindly read from [PDF File]
बारकीं पोरां जल्माला येत तव्हां पायसीं ते सरणांवर ठेवींत
तांव काहीं ना काहीं सुख दुख तं चालायंचाच, त्यां तं आहेच. पहले पायसीं आथां हलूं हलूं सगलां बदलायां लागलाहें.
रस्तं,
बिल्डिंगा, साला, लायटी, गाड्या, मोबाईल, मसनीं, कारखानं, दुकानां ना त्याचे हारीं भलतां काहीं आलाहें. य्या तं
होतूचं रेहेल, बदलतूच
रेहेल. जसां हींव पानीं आलां का आपले पांघरून ना कापडां बदलूं तसां ज्यां काहीं
बदलत जाय त्याचें हारीं आपल्यानाहों बदलाय तं लागलूच. पन काय काय,
कोढांक, कंव्हा, कोन्हानं, कसाक बदलाया पाहज त्याहों आपले बेसबरां समजून घेंन सगल्याहीं ठरवाया पाहजं.
जेनेकरून आपले लोखांच्या अडचनीं कमी होतील नां सुखान बेस रेहतीला.
आपलें जुनें लोखांहीं कसांक परतेक गोष्ट तपासून,
वापरून, परयोग दसं करून एक पिढीं बीजीं पिढीं करून करून तयार करेल
आहें. ज्यां काहीं रीतीं, खानपान, काम,
समजुतीं आहांत त्या एखादें फार जुनें पुस्तकांत लिहेल आहांत
ना आथां डोलं ओडकुन तासांचं करायचां असां नीहीं, वाडघां फार भारीं सांगत “जसं तुमचं दिस येतील तसां तुम्हीं
तुमचां करंजास, आम्हीं त जुनीं मानसां.” माना क्यां कायजून पण परतेक वेलस जुने वाडघांना नांगुन कसांक तरीं होंय.
कागदीं पुस्तकां ना डिगरी करायचे धावपलीत त्यांचेकडसीं भलतां काहीं शिकायचा रेहून
गेलां, ना
त्यांचे समोर डोकां रीताच दसां वाट. ना आपले बोगस मानुस आंहुत असां वाटत रेहे.
त्यांच विचार करींत होतुं, का य्या क्यां होंत हंवां, त ध्यानात आलां कां बारिंक पायसीं तं गावां पायसीं दूर,
सिकाया दूर रेहेल, हॊस्टेल ला सिकाया, मोठां सिकाया हो पके दूर. कव्हां कव्हां सुटेला येव पन सुटी
पुरतां,
सुट्या त कच्चा निंबू होयाच खपून जात. गावांतल्या रीतीं
निहीं माहित पडत ओलखिं नीहीं, सन नीहीं माहित होत, सुख दुःखांत नीहीं येवं. हलूं हलूं जव्हां जमल तंव्हा
शिकववं पन फरक पडेलूच. पुस्तकांत काय काय शिकवज, होस्टेल वालीं त्यांचं विचार सीकवीत,
बीजीं मानसां त्यांचा काहीं सांगत रेहेत. ते गडबडीत आपलां
ना आपले लोखांकड नांगाया चस्मा बिज्यांचा लागून जाय, त्यां समजायाच भलतीं वारसां जात. तसां होन होन आपलीं लोखांची वाटनीं दसीं होन रेहें. वेगलीं
वेगलींच होन रेहेत.
आपले लोखांची एकी करायचिं होवीं तं बारिंक पायसीं त्यांचे
हारीं चीं नाल जोडून ठेवाया काहीं कराया लागल. पहलें हरींचं रेहुन नवीन पिढी सिकत
जांय. आथां नवे जमान्यात नवे परकार नी आपल्याना नवा मारग गावसाया लागल नाल जोडाया.
मसनीं,
फोन, मानसां, पुस्तकां,
आवाज, नाच, मिटींगा, सम्मेलना,
आंदोलन, गोष्टी, कार्टून, स्पर्धा, चर्चा, संवाद, यात्रा, एकत्रीकरण, पुस्तक, पिचर, गाना, चित्रां ज्यां होंवा त्या, ज्या जमल त्यां गवसून काढून काहीं कराया पाहज. आपले
लोखांसाठी ज्या काहीं अडचनीं येत आहांत त्या सोडवायची विद्या तयार कराया आपल्यांना
परत एक होया लागलं. कोन्ही सिकेल होंवा कोन्ही नोकरीला होंवा कोन्ही धंदा करींत
होंवा कोन्ही सायेब होंवा जे कोन्ही होवं ते आपले
आपले जुगती परमान हातभार लावतील, त फार भारीं होल.
आपले सगलीं मानसां आहुंत मसनीं नीहीं तं आवडीं निवडींत फरक
तं पडायचाच. ज्याला जो झेंडा आवडल त्यांचे हारीं काम करतीला पन जंव्हा आपले लोखाना
एक होयाची गरज पडलीं तं सगल्या हीं एक होयाची सवय पाडाया पाहज. जसां जमल तसां ज्या
जमल त्यां आपले लेखांसाठी कराया पाहज. नकरीला लागलां का फक्त सवतां पुरतां यो
विचार सोडून, आपले
आपले हरिंचें मानसांचे वतीनं आहुं, जंव्हा लागल तंव्हा लोखांचे
हारीं येन लोखांचे कामीं येन असी सोय करून ठेवाय पाहज परतेकान.
जुवानांना, नोकरीला, रिटायर होदेल त्यांना एकदाच लोखांसाठी कामा कराया सांगून
निहीं काहीं होयाचां. बरिंक पायसीं त्यांची नाल जोडायचा काम कराया लागलं तय तीं
महोटीं होन आटोमेटिक लेखांचे कामाला येतीलां, एक होन काम कारातीलां, कोन्हाला सांगाय हो नीहीं लागायचा. गायचेन यासाठीं आपल्याना
काहीं कराया लागल पाडा, गाव,
साला, कॉलेज, तालुका, जिल्हा, राज्य, देश पातलीवर जाणकारांची समित्या बनवून ते ठिकानच्या अडचनीं
ते ठीकानी सोडवून ते ते ठीकानी एकी करून बेस
माणसांना निवडला तं परतेक ठिकानी
आपलीं बेस मानसां रेहतील. कामां पटापट होतीला, काहीं जागी आपलीं मानसां निहीं होवीं तरीं आपले मानसांची
एकीं नांगुन आपले हारीं चुकिचा निहीं होल.
आपली नाल जोडतांना आपल्याना वाडघाहीं सांगेल काहीं गोष्टी
लकस्यात ठेवाया लागतील. दिसायाच्यां गोष्टीं बदलत रेहेत,
बदलत रेहतीला. आपलीं विद्या असीं पाहज कां पानीं,
निंबर, वारा, हींव, पूर ज्या आलां त्यां पन आपलां काम टीकायां पाहज. वायलं झेंड,
वायलं देव, वायलं सन, वायलं नेतं, वायलीं सालां ना वायलां सीक्सन होवां तरीहों आपलीं पोरां,
जुवान, लोखां आपले लेखांसाठी पटकन एक होतीलां. नवीन जुगुत करून बेस
विद्या तयार कराया लागलं. सोशिअल स्ट्रॅटेजी का
काय सांगत त्यां तयार करून सगल्यां पांवत पोहचवायां लागल.
नवे जमान्यात आपले गांव देव, कुलदेव, आपलं सन, जल्म, लगीन, मरन रीती ना त्या करनारीं आपलीं मानसां सवासीन,
धवलेरी, सोयीन, भगत, तारपकरी, पंच,
आझूक जीं आहांत तीं सगलीं आपलीं लोखां,
नवी पिढी, सिकाय नोकरेला दूर सहराला रेहनारीं आपलीं लोखां,
बारकें बारकें सहारांत बदलणारीं गावां,
हलूं हलूं आपले लेखांचा कमीं होणारां परमान,
आपले लोखांच्या कमी होत जनाऱ्या सावलतीं. य्या सगल्याचा
विचार करून आपले जानकाराहीं मारग ठरवाया पाहजं.
आपले नवीन पिढीच्या सवयींहो नांगाया लागतीला. त्यांची भीती
कमीं करुन ज्या काहीं बेस आहें त्याहों पका सिकावया लागल. निसती डिगरी नीहीं
सवताचे पाह्यांवर उभा रेहाया ज्या ज्या कराया लागल त्या जामलां पाहज. यां करून
त्यांत आपलें लोखांचे कामांत इया पाहज. आपले कड ज्या काहीं काम तयार होय तथ आपलीं
मनासां पाहजत, फक्त
कामाला नीहीं मालक हो आपलाच पाहजत, सायबां हो आपलीच पाहजत.
ना य्या सगलां करताना आपल्यांना काहीं सोयी करून ठेवेल
आहांत सांग संविधानात, ना वेगल्या वेगल्या योजना येत त्यांचा हो अभ्यास करून सगलीं खातीं बेस काम
करीत का नीही, साला
बेस चालत का नीही, पोरां बेस सिकत का नीहीं त्याहों नंगाया लागल. कोन्ही कोठं कमी पडत होंवा, चुकत होंवा त त्या बेस करायसाठी त्यांना
सांगता आलां पाहजं.
आथा नांगा ना राज्यपालान आपल्यांसाठी आपलेकडचे नोकर भरतीत
वाटा ठेवेल पन ओढीं वारसां झालीं तर्ही आझूक हो नीही भरेल. त्याचा काहीं उपाय
कराया आपले सगल्याहीं एकीं करून म्होटा गाज कराया
पाहज. आपले लोखांच्या जमिनी म्होटे म्होटे परकल्पना दिजत,
आपलं डोंगर खणून टाकीत, जंगल तोडून टाकीत, नयीत व्याट पानीं टाकीत. आपले बाजारांचे/टेसन/हायवे चीं गांवातसीं
आपलीं लोखां चाखन्यालाहों निहीं दिसत, थोडीफार आहांत तींहो खपत जातं आहांत. वाटा ठेवेल जागेवरसीं
आपलीं मानसां निवडून जात पन आपले साठीं काहींच निहीं करींत होवीं तं काय कामाचीं?
नांगा बर आथां सांगाया तं राष्ट्रपती आपलां मानुस आहें. पन
आपले लोखांवर ओढा व्याट होय त्या बदल एकदाहो बोलवत नीहीं होंवा तं काय कामाचां.
तसांच उंद्या पंत परधान नीहीं त मुख मंतरी हो होल आपला पन जर आपले लेखांचे कामाला
नीहीं आला तं काय कामाची ती खुर्ची. तय नाव ना कागदाचे दाखल्यावरसीं आपला मानुस
गवसायचा सोडून काम नांगून आपलीं मानासां गवसून
जोडाया लागतीला घडवायां लागतीलां.
आजकाल सवलतीला कागदवले आदिवासींची कमी नीहीं आहे, रोज भलतं तयार होत.
लोखां तं गायचेन डोकीं बदलून रेहेल आहांत. तोंडासमोरसीं
पानी सहराला नीज, उरेल सुरेल आहें त्यांत हो गटारीं सोडजतहांत, जंगल त कंव्हाच खपवेल, जमिनीं वर तं टुकून पडेल आहांत,
आपले लेखांचे हातातसीं निसटून जाताहात,
वाय वायलीं केमिकल धोर प्लास्टिक खाल मासीं,
पाखरां, जनावरां, मानुस हो खपवाया सुरु होंदेल आहे. आपले सिकेल
लोखांच्यात आदिवासीत्व हो खपल्यातुच जमा आहे. असां सगलां आहें त काय करसींल
काहीं मारग आहे? आहे
काय काहीं मारग, सांग माना....
आयेबा भलते जोर्ह्यात आराडत होतुं नीजत. दादूं बिहला,
विचारीं काय झालां? मेहयान सांगला कांही नीही ना परत चादर बोन्गडून निजलुं.
रोहिदास दा ना त्यांचे टीम दोन तीन वारसांपायसीं माना सांगत होतीं ना फार दिस झालं, मानां आपले बोलीत काहीं लिहाया सांगेल होतां, पन कामाचे गडबडीत जमलाच नीही, लिहाय घेय त काय लिहूं त्याच नीही समज. त मन एक काम करींतु ज्या काहीं माझे सपनात डोक्यांत इधेल त्याच लिहून पाठवलाहें. नांगजास काहीं चुकेल होवा तं संभालूंन घिजास. नाल जोडायजोग काहीं मारग होवा त दाखवजास, बेस रेहजास. जोहार!
सचिन सातवी, वाघाडी, तालुका डहाणू, जिल्हा पालघर, महाराष्ट्र