Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

…. काय लिहू? नाळच तुटलीय तर

In Case Fonts not visible, kindly read from [PDF File] 

… जन्मापासून ते मृत्यू पर्यंत आपण जे सुख दुःख अनुभवतो ते जीवन आहे प्रत्येक जण ते जगतो. सध्याचे सार्वजनिक जीवन पूर्वीपेक्षा बरच बदललंय आधुनिक तंत्रज्ञान, यंत्र सामुग्री, साधने यांच्या उपयोगाने अधिक सुखकर होते आहे. वेळेनुसार ते बदल अविरत होत राहतील. पण या बदलांप्रमाणे समाज म्हणून आपण आपल्यात कोणते अनुकूल बदल करतो आहोत, कोणती मूल्य जगतो आहोत ते महत्वाचे आहे. ते समाज म्हणून विचारपूर्वक नियोजन करून अवगत केल्यास समाजाची समाधानी जीवनाचा इंडेक्स वाढू शकतो.

 

आपल्या आधीच्या पिढ्यांनी प्रत्येक गोष्ट स्वतः प्रत्येक्ष करून, अनुभव घेऊन, सुधारणा करून त्यात सतत विकसित करून अनेक पिढ्यात जतन केली आहे आणि त्यात इतकी लवचितकता आहे कि भविष्यात पण येणारे बदल सहज आत्मसात करून पुढे जाऊ शकता येते. आणि या जीवन मूल्यात फक्त माणूस नाही तर सभोवताली जीवश्रुष्टी, निसर्ग, पर्यावरण प्रत्येकाचा विचार करून एकमेकांना पूरक असे जगायची दिशा आहे. बहुतेक याच कारणांनी मला दोन पिढ्या आधीचे कुणी दिसले कि त्यांचे खूप कौतुक वाटते आणि स्वतःला खूप रिकामे असल्यासारखे वाटते. कागदी शिक्षणाच्या गडबडीत बहुतेक आधीच्या पिढीकडून वैयक्तिक पातळीवर जीवन मूल्य घेणे राहून गेल्याची खंत आहे.

 

खरे बघता याला सध्या उपलब्ध असलेली शैक्षणिक पद्धती पण काही प्रमाणात कारणीभूत असावी. खूप कोवळ्या वयात शिक्षणासाठी गावापासून लांब आश्रम शाळेत. सभोवताली असलेल्या परिसराचा काहीच संबंध नसलेला अभ्यासक्रम. आधी तर प्रमाण भाषा मराठी शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मग दूर कुठल्या तरी जिल्ह्यातून आलेले शिक्षक कि ज्यांना येथील भाषा आणि संस्कृती ओळख नाही त्यांच्याकडून पुस्तकातला अभ्यास शिका. त्यांच्या वागण्यातून, पुस्तकातून तयार होणारी प्रतिमा, परिसरातील साधनात असणारी माहिती यांच्या सगळ्या मुळे स्वतःच्या संस्कृती, समाजा बद्दल नकळत न्यूनगंड तयार होतो आणि पुढे नोकरी लागल्यावर तर त्याला वेगळेच स्वरूप प्राप्त होते. अशा परिस्थितीत स्वतःच्या पोरांना अलिप्त/शहरी ठेवण्यासाठी धडपड सुरु होते. कदाचित नाळ तुटण्याची हीच ती सुरवात.

 

पूर्वी सामूहिक जीवनात सहज असलेली सामाजिक नाळ जर आपल्याना नवीन पिढीत जिवंत ठेवायची असल्यास, आता बदलत्या काळानुसार उपलब्ध पद्धतींचा नियोजनपूर्वक उपयोग करून काही उपक्रम आखल्यास त्याचा उपयोग नवीन पिढीला नक्की होऊ शकेल. जिथे लहान पणापासून इत्तर प्रभाव तयार होतो त्या ऐवजी सामाजिक जाणीव, बांधिलकी आणि संवेदना जिवंत राहील आणि अशा वातावरणात तयार होणारी नवीन पिढी भविष्यात कुठेही असेले तरी ती समाजाशी असलेला ऋणानुबंध कायम ठेवेल. आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवेल आपली सामाजिक नाळ कायम ठेवेल.

 

वैयक्तिक अनुभव, आवड निवड, दृष्टिकोन, प्राथमिकता या नुसार काही फरक असणारच, आपण मशीन नाहीत. उपलब्ध विविध राजकीय आणि सामाजिक प्रवाहात असून, जिथे असू तिथून समाज हिताचे काम करणे महत्वाचे आहे. तसेच जेव्हा जेव्हा समाज म्हणून एकत्र यायची आवश्यकता असेल तेव्हा एकत्र यायची सवय असायला हवी. आपण जे शिक्षण घेतले आणि नोकरी मिळवली ती फक्त माझ्या मेहनतीच्या जोरावर मी केले या पेक्षा आपल्या समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून तिथे संधी मिळाली आहे असा दृष्टिकोन ठेवून आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल तेंव्हा समाजहितासाठी हातभार लावण्यासाठी पुढाकार घेत राहीन हि भावना हवी.

 

आपण एक आवाहन केले आणि सगळे युवा, नोकरवर्ग, निवृत्त कर्मचारी समाज हिताच्या कामाला लागले आणि सामाजिक परिवर्तन झाले असे लगेच होणार नाही. आपल्याना नवीन पिढी घडवताना हि सगळी मूल्य रुजवावी लागतील, समाजातुन सामूहिकतेचे प्रोत्साही आणि मार्गदर्शक वातावरण देणे गरजेचे आहे, त्यासाठी अवश्य व्यवस्था उभारणी गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी निर्णय प्रक्रियेत आपले जागृत प्रतिनिधित्व हवे, पाड्या पासून ते राष्ट्रीय पातळीवर विविध प्रश्न हाताळणाऱ्या नेतृत्वाची फळी / समित्या समाजातून बांधणे गरजेचे आहे. जेणेकरून संबंधित पातळीवर आपले समाज हित जपले जाईल किंवा आवश्यक असल्यास दबावगट कामी आणता येईल

 

सामाजिक उपक्रमांची सांगड घालताना, संस्थात्मक जाळे उभारताना, नेतृत्वाची फळी उभारताना त्यांचे स्वरूप काळानुरूप राहील, नवीन पिढीच्या प्राथमिकता, कायमस्वरूपी उपाय, सर्वसमावेशक, एकमेकास पूरक, स्वावलंबन आणि आदिवासीत्व लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे. जेनेकरून विविध मतप्रवाह ची माणसे पण आदिवासीत्व च्या दिशेने एकमेकांना पूरक काम करण्याची प्रेरणा घेतील. आपल्याकडे उपलब्ध ज्ञान, कौशल्य, ऊर्जा सहज समाज हितासाठी कामी आणून रचनात्मक सामाजिक उपक्रमांचे वातावरण बनविले पाहिजे.

 

वातावरणानुसार अनुकूल बदल करून घेणे हे आदिवासी जीवनमूल्यांचे वैशिष्ट्य आहे. बदलत्या जीवनमानानुसार अनेक बदल होत आहेत आणि राहतील त्याशी सुसंगत अशी जीवनपद्धती आणि सामाजिक मूल्य अवलंबणे गरजेचे आहे ज्या गतीने शहरीकरण/बाजारीकरण/भौतिक बदल होत आहेत त्यातून होणारे नुकसान, तसेच आपले साविंधानिक अधिकार, कायद्यात होणारे बदल, आपले अस्तित्व इत्यादींसाठी आवश्यक उपाय योजना समाजातून उभे राहिले पाहिजेत.

 

नवीन प्राथमिकतांनुसार जी काही कौशल्य, मूल्य, ज्ञान आवश्यक आहे ते त्या त्या वेळेस नवीन पिढीला मिळण्यासाठीची आवश्यक व्यवस्था आणि त्यावर लक्ष ठेवणाऱ्या समित्या गाव पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीवर बनवणे गरजेचे आहे. आपल्या परिसरात जे काही सेवा, उद्योग, व्यावसाय चालत आहेत त्यात आपला सहभाग आणि प्रतिनिधित्व हवे फक्त कामगार म्हणून नाही तर निर्णय घेणाऱ्या पातळीवर आणि मालक म्हणून.

 

हे सगळे करताना आपल्याना समाजातून आवश्यक दबाव गट तयार करणे गरजेचे आहे. प्रत्येक ठकाणी समाज हित जपले जातेय का सगळे उपक्रम, योजना, सेवा अपेक्षित पद्धतीने राबवल्या जाताहेत काय. संविधानिक अधिकार आणि पॉलिसी मेकिंग साठी लागणार आपला आवाज आणि नेतृत्वाची फळी बांधणीसाठी आवश्यक पाठपुरावा यंत्रणा समजावून जिवंत ठेवणे गरजेचे आहे.

 

आता हे बघा ना अनुसूचित क्षेत्रातील १७ पदांच्या भरती आणि १००% आरक्षणासंबंधी. कित्येक वर्षे होऊन गेली, त्या विषयी योग्य जागरूकता, प्रतिक्रिया, प्राथमिकता, असलेल्या सरकार कडून संबधी उपाय काढून घेणे आपल्याना आणि आपल्या लोकप्रतिनिधींना शक्य झाले नसेल तर नक्कीच हे चित्र चांगले नाही. मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट च्या नावाने आता जल जंगल जमीन जैवविविधता आणि आपले स्वावलंबन गमावतो आहोत. हळू हळू अनुचित क्षेत्रात आदिवासींचे प्रमाण कमी होत आहे, जर आपले लोकप्रतिनिधी या विषयी समाज म्हणून आक्रमक भूमिका घेत नसतील तर आपण कुणाला कशासाठी निवडून देतो याचा विचार करणे गरजेचे आहे. चांगले प्रभावी पर्याय समाजातून घडवणे गरजेचे आहे.

 

आणि सामाजिक काम करताना त्याचे नाव/जमाती पेक्षा त्याचे काम लक्षात घेणे गरजेचे आहे. समाजाला अपेक्षित कार्य आपण करतो आहोत का, आपल्या सामाजिक संवेदना जिवंत आहेत का. प्रत्येक संविधानिक किंवा प्रशासकीय पदी त्या ठिकाणच्या दायित्व आणि नियमा नुसार काम करणे अपेक्षित असते. तरी सांगायला सध्या आपल्या देशाचे राष्ट्रपती पद आदिवासी महिलेकडे आहे, उद्या पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रीही आदिवासी बनतील पण जर समाजासाठी पुढाकार घेऊन समाजाची किंवा समाजासाठी स्पष्ट आग्रही भूमिका मांडत नसतील आणि समाजाच्या कामी येत नसतील तर काय कामाचे असे पद? किंवा प्रशासनात अनेक अधिकारी आहेत, आहेत त्या ठिकाणी प्रामाणिक प्रभावी काम करणे हे प्राथमिक आहे आणि सोबत समाज हिताच्या उपक्रमांना सक्रिय पाठबळ दिले तर त्यांचा समाजासाठी उपयोग होईल. आणि जर समाजासाठी कामी नसतील येत तर त्यांच्यात आणि बोगस आदिवासींत फार काही फरक नाही असे वाटते.


बघाना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीपण आपल्याना झोपेतून उवत नाही, आपल्या समोर आपले पाणी शहरांना नेले जाते, उरलेल्या नदी प्रदूषित होत आहेत. जमिनी शासकीय पद्धतीने अधिग्रहित होत आहेत, खाजगी खरेदी करून कुरतडल्या जात आहेत. जंगल आधीच संपवले आहेत आता उरलेले डोंगर पण खणुन नेत आहेत. औद्योगिक कारखाने आपल्या जगेल प्रदूषण येथे आणि तेथील रोजगाराच्या संध्या इत्तर राज्यातील कामगारांना, अधिकारी आणि मालक दुसऱ्या जिल्ह्याचे. आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात आपल्याना समाजातून स्थानिक प्रभावी नेतृत्व तयार करून पुढे आणता येत नसेल तर खरच राजकारण अधिक चांगल्या पद्धतीने शिकून त्यात कुशलता वाढवणे गरजेचे वाटते. भौतिक विकास जरी दृश्य स्थिती बदलत दिसेल रंगीत इमारती, अनेक पदरी रस्ते, चकचकीत दुकाने, गाड्या, पाट्या, ब्यानर पण समाज म्हणून आपले स्वावलंबन बघणे गरजेचे आहे आपली नवीन पिढी स्वतःच्या पायावर उभी आणि इतरांसारख्या उंचीवर पोचते आहे का सामान संधी मिळते आहे का हे लक्षात घेणे गरजेचे आहे. खर्रर्रर्र ट्र्र्रर्र्र .. हॅलो येतोय ना माझा आवाज, हॅलो हॅलो... उप्स, स्वप्न होते. थंडी लागली होती, ब्लॅंकेट सरकले होते, ब्लॅंकेट ओढले आणि पुन्हा झोपलो.

 

रोहिदास दा आणि त्यांच्या टीम ने गेल्या काही वर्षांपासून माझ्याकडे लेखासाठी विनंती केली होती, पण मला जमलेच नव्हते. या वर्षीपण अनेक दिवसांपासून त्यांनी सांगितले होते बोलीभाषेतील लेख पाठवा, पण मला सुचतच नव्हते काय लिहू, एक विषय घेतला कि मोठी यादी तयार होते विषयांची कि जे आदिवासी समाजासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्या गोंधळात लिहनेच राहून गेले, म्हणून कदाचित डोक्यात विषय सुरु असताना असे स्वप्न पडले. म्हणून मग मधला मार्ग काढला जे काही डोक्यात आले होते तेच लिहून काढले. काही चुकीचे असल्यास क्षमस्व पण आदिवासीत्व जतन करून समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी समाज एक कुटुंब म्हणून संवाद करून आवश्यक प्रयत्न करत राहूया. let’s do it together! जल जंगल जमीन जीव जोहार आदिवासीत्व!

सचिन सातवीवाघाडीतालुका डहाणूजिल्हा पालघरमहाराष्ट्र 

Find us on Facebook