Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva
Showing posts with label Connected peoples. Show all posts
Showing posts with label Connected peoples. Show all posts

पंचायत (विस्तारित अनुसूचित क्षेत्र ) कायदा १९९६ च्या तरतुदी

पंचायत ( विस्तारित अनुसूचित क्षेत्र ) कायदा -- १९९६ -----च्या तरतुदी 
कायदा ४० / १९९पंचायत ६ दिनांक ४२ डिसें.१९९६ , भारतीय संसदेत पास झालेला, प्रस्तुत कायदा भारतीय संविधानाच्या IX भागातील पंचायतीच्या अनुसूची क्षेत्रासंबधीचा आहे.
 १] या कायद्यात पंचायत ( विस्तारित अनुसूचित क्षेत्र ) कायदा -- १९९६ ची तरतूद आहे.२] या कायद्यातील अनुसूचित क्षेत्र म्हणजे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्र. [१], कलम क्र. २४४ च्या प्रावधानातील अनुसूचित क्षेत्र होय.भारतीय सविधानाचा विस्तारित IX भाग भारतीय सविधानाचा विस्तारित IX भागातील करण्यात आलेले अपवाद आणि सुधारणा...नियम क्र. ४ A ) राज्य विधी मंडळाव्दारा मान्य पारंपारिक कायद्यान्वये सामाजिक व आर्थिक रिती रिवाजानुसार सामुहिक संसाधनाच्या पारंपारिक प्रशासकीय रिवाजानुसार प्रक्रिया निर्माण करणे.B ) ग्राम या संज्ञेत छोटे छोटे वस्तीचे खेडे, लोकसमूह किंव्हा समुदाय जो की, आपल्या परंपरा रितीरिवाजा अनुसरून दैनदिन व्यवहार पार पाडणारी प्रक्रिया होय.D ) प्रत्येक ग्राम सभा समुदायाच्या परंपरा व रीतीरिवाज, त्यांची सांस्कृतिक ओळखीचे सामुहीक संसाधन आणि पारंपारिक रितीने लवाद सोडविण्याच्या प्रक्रियेचे जतन करून ग्राम पातळीवर त्याचे संरक्षण करतील.E ) प्रत्येक ग्राम सभा ही.. i ) योजना व कार्य प्रकल्पाला मंजूर करून सामाजिक व आर्थिक सुधारणा बाबतचे प्रस्ताव कार्यान्वित करण्यास ग्राम पातळीवरून पंचायतीकडे पाठविण्यात येईल. II ) या योजने साठी लाभार्थ्याची ओळख निच्चीत करून कार्यक्रम राबवतील.F ) प्र त्येक ग्राम सभा अनु. क्र. E प्रमाणे प्रकल्प व प्रस्ताव कार्यक्रमानुसार झालेल्या खर्चाचे विवरण पंचायतीला सादर करतील.G ) प्रत्येक पंचायात अनुसूचित क्षेत्रातील आरक्षणा प्रमाणे लोकसंखेच्या आधारे संविधानाच्या, IX व्या भागाला अनुसरून आरक्षित जागा ठरवतील.आदिवासीच्या आरक्षित जागा ह्या १/२ पेक्ष्या कामू असू नये.सर्व पंचायतीचे अध्यक्षाची पदे आदिवासी साठी राखीव असतील H ) जर त्या पंचायती मध्ये आदिवासी प्रतिनिधी उपलब्ध नसेल तर, राज्य शासन इतर पंचाती मधून आदिवासी अध्यक्ष नामनिदर्शित करतील.I ) अनुचित क्षेत्रात प्रकल्प उभारणीसाठी जमीन हस्तांतरण करण्यापूर्वी, आणि पुनर्वसन करण्या साठी ग्राम सभा किंव्हा पंचायत कडून राज्य स्तरावर विचार विनिमयाचे सहकार्य घेतील. J ) लघु पाटबंदारे, पाणी वाटपाचे प्रस्ताव व्यवस्थापन पंचायत व्दारा उच्च स्तरावर घेतील.K ) अनुसूचित क्षेत्रातील लघु खनिज संबधी लाइसन्स देण्यासाठी किंव्हा माइन्स लीजसाठी, ग्राम सभा किंव्हा पंचायतची शिफारस असणे बंधनकारक असेल. L ) अनुसूचित क्षेत्रातील लघु खनिज संबधी कोणतीही लिलावाच्या वेळी सवलत देताना ग्राम सभा किंव्हा पंचायतची शिफारस बंधनकारक असेल.M ) अनुसूचित क्षेत्रातील ग्राम सभा व पंचायातीना स्वशासन उभारण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार व आधिकारी देवून त्याची अंमलबजावणी साठी राज्य विधी मांडला व्दारे देखरेख ठेवेल. I ) नशेली अनुसूचित क्षेत्रातील लघु खनिज संबधी पदार्थाचे सेवन प्रतिबंद करणे व परवाने देण्या बाबतचे अधिकार.II ) लघु जंगल उत्पादित मालावरील अधिकार III ) अनुसूचित क्षेत्रातील जमिनी हडप करण्यास प्रतिबंद घालणे, किंव्हा आदिवासीच्या जमिनी हडप करण्यात आल्या असतील तर त्या परत मिळवून देण्याचे अधिकार बहाल करणे.IV ) बाजार हात बाबतचे व्यवस्थान करणे,V ) सावकारी वर नियंत्रण ठेवणे,IV ) सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थावर नयंत्रण ठेवणे,N ) ग्राम सभेला व पंचायतीला, स्वशासानाचे संरक्षण करणारी संस्था म्हणून त्यानुसार कार्यभाग पार पडण्यासाठी अधिकार बहाल झाल्याबाबतची खात्री राज्य विधीमंडळाकडून बहाल केल्या जाईल.O ) संविधानातील ६ व्या अनुसूचीतील साकारलेल्या प्रावधानाची प्रशसकीय यंत्रणा जिल्ला पातळीवर पंचायतीना लागू करण्यास संबधी राज्य विधिमंडळ अधिकार बहाल करतील. ५] ह्या कायद्यानुसार संविधानाच्या IX भागात काही बदल व सुधारणा करून अनुसूचित क्षेत्रातील पंचायतीचा कायदा बनविण्यात आला. संविधानाच्या IX व्या भागाला हस्तक्षेप करण्याचे अधिकार मा. राष्टपतीला असल्यामुळे त्याच्या अधिकारा प्रमाणे कायद्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत किंव्हा त्याच्या आत राज्य विधी मांडला कडून पास होई पर्यंत अबाधित राहील.

के एल मोहनपुरिया 
सचिव, भारत सरकार

आदिवासी दिन कसा साजरा करणार?

आदिवासी दिन कसा साजरा करणार?

TSP परिसरातील रोजगाराच्या संधी स्थानिक आदिवासींना देण्यात याव्या हा राज्यापाल्यांची अधिसूचना आदिवासी विकासात मोलाची भूमिका पार पडू शकते. तयार आहात आपल्या भावंडाना दिशा देण्या साठी ?

गाव आणि तालुका पातळीवर आयोजित करिण्या करिता 

१ ऑगस्ट पर्यंत
➀ सामाजिक जागरुकता करूयात
शिक्षणा विषयी जागरुकता
नोकरीच्या संधी विषयी जागरुकता
कौशल्य विकास जागरुकता

५ ऑगस्ट पर्यंत
➁आदिवासी एकात्मता वाढवूया
गावातील सुशिक्षितांची यादी बनवणे
तालुका पातळीवर यादी संकलित करणे
यादीची प्रत आणि अर्ज तयार करणे

९ ऑगस्ट
➂आदिवासी दिन साजरा करूया
मोठया संखेने एकत्रित येउन संकलित केलेले अर्ज एकत्रित PO/ATC यांना सुपूर्द करणे
उपलब्ध असलेल्या उर्जेचा सामाजिक कार्यात सकारात्मकतेने रचनात्मक उपयोग करणे

राज्यपालांच्या अधिसूचने नुसार निर्देशित केलेली पदे : तलाठी, सर्वेक्षक, ग्राम सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, कृषी सहायक, पशुधन सहायक , परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी

सेवा योजन नाव नोंदणी किवा ओनलायीन नाव नोंदवा !www.maharojgar.gov.in

जास्तीत जास्त बेरोजगारांनी नोंदणी करून उपलब्ध रोजगाराच्या संधी चा उपयोग करावा.
आपण सगळ्यांनी ठरवले तर, ह्या वेळेस चा आदिवासी दिन एक नवी दिशा देणारा ठरेल !



Sign Petition for Swayatt Adivasi Jilha


Shared with you
Hello, I just signed this petition and wanted to ask for your support. The more people who join the campaign, the more likely it is to win. Will you help by adding your name?
Thanks,
AYUSHonline team










आपल्या सर्वांमध्ये या न त्या रूपाने 'बिरसा' आहेत

आज भगवान बिरसा मुंडा यांची १३८वि जयंती सर्व आदिवासी बांधव दिमाखात साजरे करतील,बिरसा मुंडा यांच्या महान कार्याला सलाम करत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील,भाषणे देण्यात येतील दिवसा अखेर सर्व जन आपल्या मनात बिरसांना वंदन करत पुढची जयंती कशी साजरी करावी हे ठरवतील …? करणारच!...  का नाही कारण बिरसा मुंडा हे नावच आपल्या समाजासाठी इतके प्रेरणादायी आहे,मग त्यांची जयंती आपण नाय साजरी करणार तर कोण करणार …?
 आज प्रत्येक आदिवासी तरुण फेसबुक सारख्या माध्यमातून आपल्या मनात 'भगवान बिरसा मुंडा' यांना नमन करताना बघून खूप अभिमान वाटतोय ,आपल्या तरुणात पसरत असलेली हि जागरुकता खरेच समाजाच्या दृष्टीने हितावह आहे.
        भगवान बिरसा मुंडा हे आदिवासींच्या अधिकारांसाठी स्वाभिमानासाठी लढले अमर झाले,मातृभूमीच्या रक्षणासाठी ते झटले. समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी शस्त्र हाती घेतले.
        आज आपण स्वतंत्र असूनही गुलामासारखे वागवले जातोय,हे पाहून बिरासांनी पुन्हा अवतरावे असे वाटते,परंतु आपल्या एक लक्षात येतेय का कि आपल्यात 'बिरसा' आजही जिवंत आहेत, त्यांच्या विचारांच्या रुपात! आदिवासी समाजासाठी खऱ्या मनाने झटणारा प्रत्येक जण  'बिरसा' आहे . आदिवासींसाठी जागृती करणारा प्रसंगी मोर्चे बांधणी करून पोलिसांचा मार खाणारा,तर ज्ञान रुपी शस्र हाती घेवून कायद्याने आदिवासींसाठी लढणाराही बिरसाच आहे !
       इतकेच काय आपल्या सर्वांमध्ये या त्या रूपाने 'बिरसा' आहेत फक्त त्यांना ओळखणे आपल्यात लपलेल्या या 'बिरसा' रुपी विचारांना कृतीत उतरवण्याची गरज आहे . केवळ आजच्याच दिवशी नाही, तर रोजच बिरासांचे नमन करुयात  ,त्यांच्या विचारांचे अवलोकन रोजच केले तर ती त्यांना खरी सलामी असेल.
        आपल्या तरुण पिढीला बाकीचा इतिहास तोंडपाठ असतो परंतु आपल्या आदिवासी विरांबद्दल फारशी माहिती नसते,आपण शिकलेल्यांनी पुढे येवून जर हा इतिहास पुढे आणला तर, आपल्या आदिवासी वीरांच्या महान कार्याला सलामी ठरेल   येणाऱ्या पिढीला हा ज्ञानकोश उपलब्ध करून देउ  शकतात . केवळ बिरसाच नाही तर असे अनेक क्रांतिवीर होऊन गेले,जे आपल्या समाजासाठी झटले ,त्यांचा इतिहास आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
       केवळ आजच्या दिवशी बिरसांच्या कार्याला सलामी करण्यापेक्षा बिरसांच्या विचारांना कृतीत उतरवून त्यांना रोजच सलामी देउयात. बिरासांची आज आपल्या समाजाला खरेच गरज असताना आपल्यातील प्रत्येक जण जर 'बिरसा' झाला तर खरोखरच 'उलगुलान' होईल! आणि 'आपण सुरु केलेल्या उलगुलान चा कधीच अंत होणार नाही' हा बिरसांचा विश्वास सार्थकी लागेल. यासाठी प्रत्येकाने शस्र घेवून मैदानात उतरणे शक्य नसले, तरी जे आपणाकडून शक्य होईल ते आपल्या समाजासाठी करणे गरजेचे आहे .
     भगवान बिरसा मुंडा हे आपले नायक आहेत,आज या नायकाला त्यांच्या १३८ व्या जयंती निमित्त नमन करून आपल्या समाजासाठी बिरसांसारखे कार्य करण्याचा प्रण करूयात !


-    संचिता सातवी

AYUSH connected peoples

it is neceesary to know how many peoples connceted with us & how far we reach
so listing the numbers by which AYUSH is connected at different sites.

AYUSH coverage

AYUSH samrajya
1
AYUSH mail blast
1015+
2
AYUSH orkut profile
306+
3
AYUSH orkut communities
2300+
4
AYUSH sms blast
500+
6
AYUSH other online sites
300+
updated on jul 2010

Find us on Facebook