Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

Save Land! Save Tribals ! कुणी जमीन देतेय का जमीन ? " आवाज तलासरीच्या डोंगारीतून

तलासरी येथे घडलेल्या घटनेने सर्व आदिवासींचे चित्त तर खवळलेच, पण या अघोरी कृत्य करणाऱ्यांना 'माणूस' म्हणावे का हा हि एक प्रश्नच उभा राहिला आहे. आज आदिवासींना त्यांच्या जमिनीवरून हुसकावून लावण्यात येत आहे. पिढ्या न पिढ्या ज्या जमिनी त्यांनी कसल्या त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या जमिनी फक्त एक भू भागाचा तुकडा नाही, जो कुणीही हिसकावून घ्यावा, हि जमीन म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेले संस्कार आहेत, जे पिढ्या न पिढ्या त्यांनी जपले आहेत. ते अशे सातबाऱ्यावर कसे मोजता येणार? 

कनसरी मातेवर बुलडोझर फिरवून फक्त आदिवासींच्या भाताचेच नुकसान नाही केलेय तर त्यांच्या भावनांचा खेळ करून, त्यांच्या संस्कृतीवर पण घाला घातलाय. अन आदिवासी संस्कृतीवर घाला म्हणजे आदिवासी समाज अस्मितेवर केलेला आघात आहे !

धरतीला पाय लावण्या पूर्वी "अथ नाचू का कोठ नाचू, धरतरी माझी माय रं, पाय कसा लावू तील ?" असे म्हणणारा तसेच जमिनीतून पिकवलेल्या अन्नाला जीव पेक्षा जास्त जपणाऱ्या आदिवासींच्या भातावर जेव्हा बुलडोजर फिरवला जातो तेव्हा तो त्याच्या हृदयावर फिरवला जातो. कारण तुमच्या साठी फक्त हे धान्य असेल, ज्याची किंमत पैशात मोजली जाते. पण आदिवासींसाठी ती कनसरी माता आहे, आणि मातेची किंमत पैशात करणाऱ्या सारखा दुसरा पांखंडी कुणी नाही. कनसरी मातेची पूजा केल्या शिवाय तिचा घास हि न घेणारा आदिवासी जेव्हा तिच्यावर बुलडोजर फिरताना पाहतो, तेव्हा त्याच्या हृदयावर तलवार नाही फिरली तर तो आदिवासी काय?

सकाळी सकाळी शेतात दिमाखाने नाचणारी कनसरी माता चिखलात तुडवली जात असेल तर हवालदिल आदिवासी च्या डोळ्यात अश्रूंचा अंगार येतो आणि त्याच्या पायाची आग मस्तकात जाते. पण मोठ्या शक्तींकडून ती आग बुल्डोजारच्या चाकाखाली शमविली जाते. किती दिवस आदिवासी असा हवालदिल होत राहणार? कधी प्रकल्पाच्या नावावर... कधी शहरीकरनाच्या निमित्ताने, तर कधी धरणे आणि पुनर्वसनाच्या निमित्ताने (सुसरी धरण, दापचरी प्रकल्प, सूर्या प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग ८ चौपदरीकरण, गेल वायू पायीप लयीन, ओएनगीसी डहाणू मध्ये २००० एकर, मुंबईतले अंधेरी, गोरेगाव, बोरीवली .... आसामचे बोडो, बस्तर चे दंतेवाडा, ओडीशाचे वेदांता, ...) आता फक्त देश सोडून जाणे तेव्हडे बाकी राहिलेय (ते पण पालघर मध्ये गेल्या वर्षी काही पाश्चिमात्य शक्तींनी चालू केले होते, म्हणे इझ्रायीलला नेणार होते) 

प्रत्येक दिवस आदिवासी हा अन्याय सहन करतोय, का म्हणून सहन करायचे आदिवासींनी हे अन्याय? आदिवासींच्या प्रश्नांचे भांडवल करून त्यांना मदत (?) करणाऱ्यांची संख्या पण काही कमी नाही. आज "अमका" एक साहेब आला त्याने कपडे दिले तर "तमक्याने" ब्लंकेट अन खावू दिले, या अन अशा अनेक बातम्या ऐकिवात येतात. पण आदिवासींना दयेची भिक नकोय ते मुळातच निसर्ग संपन्न भागाचे मालक आहेत. खायला नाही म्हणून खाद्य पदार्थ आणि पांघरायला ब्लंकेट देण्या पेक्षा, निसर्गाचे वैभव ज्यांच्या अंगणात नांदत होते, त्या आदिवासीवर हि लाचारी का आली याचा शोध घेतला आणि उपाय योजना केल्या तर नक्कीच आदिवासी पूर्वी सारखे संपन्न आणि स्वावलंबी आयुष्य जगू शकेल, जखमेवर तात्पुरते मलम लावण्या पेक्षा 'जखम का झाली' याचा शोध घेतल्यास खऱ्या अर्थाने विकासास हातभार लागेल. विकासाच्या नावावर त्यांना लाचार बनवन्या पेक्षा त्यांना सक्षम बनवले तर ते जास्त हितावह ठरेल. 

विकासाच्या नावाखाली धर्मांतर सारखे पर्याय सुचवले जाताहेत, अन धर्मांतरवर काही बोलल्यास सुशिक्षितांचे (कि अर्धशिक्षित ?) प्रश्न तयारच असतात,"कि म्हणे संविधानाने प्रत्येकालाच कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे, मग तुम्ही विरोध का करता?" धर्मांतराला आमचा विरोध नाही. ज्याने त्याने आपली आदिवासी संस्कृती जपत आपल्या मर्जीने धर्माचे अवलंबन करावे. पण असे स्पष्टीकरण देणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे, कि संविधानात धर्मांतराचा अधिकार पाळत असताना आदिवासींचा जमिनीचा हक्क बाधित ठेवण्याचा अधिकार का पळत नाही? कारण संविधान म्हणते कि, 'आपला अधिकार वापरत असताना दुसऱ्याच्या अधिकारास तुम्ही बाधा पोचत असेल, तर ती राज्यघटनेची पायमल्ली आहे. मग आज किती तरी एकर आदिवासींची जमीन त्यांना फसवून , त्यांच्या अज्ञानाच फायदा घेऊन प्रसंगी लुबाडून बिगरआदिवासींच्या ताब्यात आहेत, तेंव्हा मग इथे कुठे जातो कायदा न संविधान? कि असला काही अधिकार संविधानात आहे हे अशा सुशिक्षितांना (कि अर्धशिक्षित?) माहीतच नाही...? आज किती तरी आदिवासींना स्वतःच्या जमिनीवर गडी म्हणून राबवून घेतले जात आहेत. बस्तर मध्ये तर लाखोंचे स्थलांतर झाले, लाखोंना नक्षलवादाच्या मार्गाला लावले आणि हजारोंचे बळी घेतले गेले, तेव्हा कुठे गेले संविधान? मग इथे का कुणी संविधानात दिलेल्या अधिकाराची भाषा बोलत? ‘देव देतो अन कर्म नेते म्हणतात ना, तसे संविधानाने दिले अन समाज कंटा कानी नेले' असे झालेय !

गगनचुंबी इमारती मध्ये राहण्याराना न चकचकीत भांडया मध्ये चमचमीत पदार्थ हासडून खाणाऱ्याना काय कळणार कनसरीचे मूल्य? एक वेळचे जेवण मिळत नाही म्हणून कळकट बशीतून दुपारचे जेवण घोटभर चहावर भागावनाऱ्याला कळते कनसरीची किंमत! एकीकडे प्रतिष्टेच्या नावावर आपल्या मुलांवर लाखो खर्च केले जातात तर दुसरी कडे, एक रुपयाच्या नाण्यासाठी रडून रडून कोमेजलेल्या मुलाला समजावताना अन पोर ऐकत नाही म्हणून काळजाला गाठ मारून पोराला बदड बदड बदडवाऱ्या हवालदिल मातेला पहिले कि, तेंव्हा खरेच चीड येते तुमच्या श्रीमंतीची! 

श्रीमंत होणे हा गुन्हा नाही पण इतरांवर अन्याय करून श्रीमंत होणे हा खरोखरच मोठा मानवी अपराध आहे. कारण इथे माणूसकिचाच अंत होतो! अशा वेळी काही दीड शहाणे असा हि प्रश्न करतात कि "तुम्हाला कुणी अडवलय...? तुम्ही हि कमवा पैसे" अन आदिवासींच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्न करतात, तेव्हा अशांचा राग न येता कीवच येते, अरे ज्या काळात आयुर्वेदाचा, धनुर्विद्येचा, धातुशात्र, तसेच इत्तर शस्त्रांचा गंध हि नव्हता त्या काळात आदिवासी या विद्या मध्ये पारंगत होता, या अन अशा किती तरी गोष्टी त्याने बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवल्या होत्या. पणआज आदिवासींच्या आत्मविश्वासावरच घाला घातला जातोय, एका धक्यातून सावरत नाही तोच दुसरा! 'आज नवीन कायदा, उद्या जमिनीवर धरण बांधणार, उद्या नवीन प्रकल्प अन पुनर्वसन होणार,'हे अन असे अनेक आघात ! मग मनोधेर्य खचलेला आदिवासी फक्त जगण्या साठी हि लढावे. धडपडावे लागते . संपत्ती मिळवणे तर राहिलेच, पण त्यांची जंगल अन जमीन संपत्ती पण समाज कंटाकांच्या घशात जाते . 

काय विसंगती आहे हि नाही , आपले सरकार कसाब सारख्या नाराधामावर करोडो रुपये खर्च करू शकते ,परदेशीयांना आश्रय देवू शकते. पण आदिवासींचे प्रश्न सोडवणे तर दूरच....पण ते जग जाहीर करायलाही यांची हिम्मत होत नाही. कारण काय तर परकीयांना थारा दिल्यास मतांमध्ये भर पडेल, पण आदिवासींना अभय दिल्यास ते निर्भय होवून परीस्थितीचा सामना करतील, अन मग काय... त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या जमिनी बिल्डरच्या घश्यात घालणे तर दूरच पण त्यांच्या विकास साठी मिळणारे (?) प्याकेजचा पण हिशोब द्यावा लागेल. मग यात त्यांचे नुकसानच नाय का? ! 

खरच नटसम्राट या प्रसिद्ध नाटकातील डॉ. श्री राम लागुंचे सवांद आठवतात " कुणी घर देते का घर" एके काळच्या नटसम्राटाच्या तोंडचे हे केविलवाणे संवाद! उत्तम नाट्य रचना अन अप्रतिम अभिनयाची सांगड हे या नाटकाचे वैशिष्ट्य!! आज अशीच काहीशी आदिवासींची अवस्था झालीय. लाख मोलाच्या जमिनीचा मालक असूनही आज कुणी" जमीन देते का..... जमीन....?" असे म्हणायची वेळ आली आहे त्याच्यावर! (तलासरी काही वर्षा पूर्वी हा तालुका ९५ % आदिवासी लोकसंख्या असलेला होता)

स्वतःच्या फायद्यासाठी आदिवासींच्या भावनाशी खेळणे हि माणुसकी आहे ?..... कनसरी मातेवर बुलडोजर फिरवणारी माणसेच होती कि पशु ?.... या प्रकाराला जर माणुसकीच्या नजरेतून पहिले तर माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे, हे अन अशा मानवी रूपातल्या पशूंना क्षमा नाही, मग तो कोणत्याही जाती धर्माचा अगदी आदिवासी असला तरी त्याला माफ करणे अशक्य!

आदिवासी समाजाने संघटीत होवून अशा परिस्तितीशी सामना कार्याची तयारी ठेवावी, आपली संस्कृती परंपरा आणि अस्मिता याचे जतन करावे. आदिवासी तरुणांना समाजीक जाणीव आणि जबाबदारीची जाणीव करून देणे महत्वाचे आहे. आपल्या समाजात जागरुकता करणे हे आपले कर्तव्य समजून आपण जागरुकता करण्या साठी प्रयत्न केले पाहिजेत. झोपले असाल तर जागे व्हा नाही तर तो वेळ फार लांब नाही जेव्हा बुलडोजरच्या चाका खाली असेल आदिवासी आणि त्याची अस्मिता

- आदिकन्या | संचिता सातवी (28 Aug 2012)

Read Live updates at : https://www.facebook.com/media/set/?set=a.515662081792867.138081.100000472403313&type=1
Author @ Google

Mi Adivasi Bolatoy | मी आदिवासी बोलतोय ....


आज मी बोलणार आहे, इतकी वर्षे मनाला बोचणाऱ्या यातना सहन करून जगणारा मी. ढोरां सारखी मेहनत करून उपाशी मरणारा मी. जंगलाचा राजा असूनही बेघर असा मी. आज बोलणार आहे माझ्या सहनशक्तीचे बंध आता फुटलेत. मुग गिळून बसने आता केवळ अशक्यच !
काल सर्व भारतवासियांनी स्वातंत्रदिन उत्साहात साजरा केला, ... झेंडा वंदन, मिरवणूक, पताका........अगदी उत्साहात !
पण मी तुम्हाला विचारतो, आपण खरेच स्वतंत्र झालोत कि स्वातंत्र्याचा फक्त टेंभा मिरवतोय ?  ते इंग्रज होते ज्यांनी आपल्या देशावर राज्य केले. आणि ते क्रांतिकारी ज्यांनी  देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. पण आजचे काय खरेच गुलामगिरी संपलीखरेच स्वातंत्र्य आले.? अन कसले स्वातंत्र्य?
देशात बांगलादेशीयांना आश्रय देवून मुळवासी असलेल्या आमच्या जातबंधावाना त्यांच्या जागेवरून हुसकावून लावण्याचे स्वातंत्र्य नक्षलवादी सांगून छाताडावर गोळ्या घालण्याचे स्वातंत्र्य. आमच्या जमिनी हिस्कावताना आया बहिणींची अब्रू लुटण्याचे स्वातंत्र्य. ...कि आम्हाला मिळणाऱ्या सवलतींच्या जोरावर गाड्या फिरवण्याचे स्वातंत्र्य. कसले स्वातंत्र्य ..?
एकेकाळी जंगलाचा राजा मानला जाणारा मी आज लाचार कुणामुळे झालाय. कोण जबाबदार याला ..? भ्रष्टाचारी सरकार जे फक्त आकडे मोजून गरिबी कमी झाल्याच्या फुशारक्या मारते... आमच्या सवलतीवर स्वताचे खिसे गरम करणारे नेते.... कि आमच्या जमिनीवर रक्ताचे पाट वाहून राजमहाल बांधणारे सरकारचे दलाल, आमच्या समस्यांचे भांडवल करून स्वताची पोळी भाजणारे राजकारणी.... कि आम्हाला लाचार, बिच्चारे म्हणवणारे पांढरपेशी.... कोण कोण जबाबदार आहे ...?
कधी कुणावर विसंबून न राहिलेला मी आज लाचार का झालो ? ...आमच्या जमिनींवर, सवलतींवर डोळा ठेवणारे का फोफावलेत... आम्हाला जमीनदोस्त करून आमचे अस्तित्व मिटवू पाहणाऱ्यांची  वृत्ती का अधिकाधिक सोकावत चाललीय ...?
देशाचा सर्वात पहिला वासी मी. आज माझेच अस्तित्व धोक्यात आलेय न असे करणारे कोण.? माझेच देशबंधू ! मग मी स्वातंत्र्य कसा ?
एकीकडे लखलखत्या दुनियेत प्रगतीचे आकडे भराभर वाढत असताना. न महासत्ता बनण्याची स्वप्ने घडवणाऱ्या देशात आम्हाला पिण्याचे पाणी नशिबात नाही मग कसली प्रगती.? राकट देशा.. ,कणखर देशा....दगडांच्या देशा म्हणवणाऱ्या या देशात जंगलाच्या राजाची अशी केविलवाणी अवस्था असेल तर अशा स्वातंत्र्यापेक्षा इंग्रज बरे असे म्हटल्यास नवल ते काय !!
तर दुसरीकडे आमच्या जमिनी घशात घालण्यासाठी आमच्या जात बांधवांची खुलेआम कत्तल केली जातेय. त्यांना नक्षल वादी ठरवले जातेय. रोजच्या रोज नक्षल वाद्यांना मारल्याच्या बातम्या मोठ्या अभिमानाने सांगितले जातेय. मग नक्षलवाद संपत का नाही?  कारण मारले जाणारे माझे जात बांधव आहेत  नक्षलवादी नाही ...
प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या समाजाचे रक्षक म्हणवनारयांचे हे अघोरी कृत्य ! रक्षक हेच आमचे भक्षक बनल्यास स्वरक्षणासाठी आम्ही बंदुका का उचलू नयेत? जिथे आम्हाला पिण्याचे पाणी नाही तिथले सरकार मोफत मोबाईल वाटणी जाहीर करतो.. वा खरेच किती मोठी प्रगती आहे हि ..!
पैसा नाही, जमीन नाही, कि डोक्यावर छप्पर नाही, शिक्षण आहे ...ते फक्त कागदोपत्री आकड्यांवर... सवलतींवर नाग फना काढून बसलेले,अन सर्व धर्म समभाव मानणाऱ्या या देशात आदिवासी म्हणून हीन वागणूक देणाऱ्यांची संख्या पण कमी नाही, मग आम्ही जायचे कुठे ..?
जर असेचआमचे शोषण होत राहिले तर आमचे अस्तिवच नष्ट होयील आणि आमच्यावर अन्याय करणाऱ्या लांडग्याची आग शमेल....थांबवा हा अन्याय ! अन्यथा आम्ही पेटून उठू, आणि आमच्यावर अन्याय करणार्यांना भस्म करू ! आमच्या सहनशक्तीचा अंत आता संपलाय ..... तेव्हा क्रांती झाली होती इंग्रजां विरुद्ध! आता हि एक क्रांती घडेल आमच्यावर अन्याय करणाऱ्या विरुद्ध.

- Sanchita Satvi 
Author @ Google

AYUSH | Adikanya | Group of tribal girls


नमस्कार!
मी आलेय.... तुमच्या भेटीला..... जगाच्या नवीन प्रवाहात सर्व आदिवासी भगिनींना एकत्र आणायला, यशाची खुणावणारी नवीन शिखरे संगनमताने सर करायला, आणि सर्व आदिवासी भगिनींना एकत्र आणून प्रगत व जागृत असा आदिवासी समाज घडवायला! आदिवासी संस्कृती स्त्री प्रधान संस्कृती आहे असे म्हंटले जाते.

मी कुणी दैवी शक्ती नाही कि चुटकी सरशी प्रगत समाज घडवायला किंवा चमत्कारही नाही, मी तुमच्यासारखीच आहे, तुमच्यातलीच आहे, आणि तुमच्यासाठीच आहे . मी आहे एक आदिकन्या! सख्यांनो ,आपण समाजाचा एक मुख्य आणि अनिवार्य घटक आहोत, हे विसरू नका, मग आपण मागे कश्या ? ज्या समाजातील स्त्री साक्षर आणि जागृत असते तो समाज नेहमीच पुढारलेला असतो .कारण एक स्त्री एक कुटुंब घडवत असते, जर स्त्री सक्षम असेल तर सक्षम कुटुंब घडते अन पर्यायाने एक सक्षम समाज !

बहुतेक कवितांमध्ये अथवा कथा कादंबऱ्या मध्ये स्त्रीचे वर्णन एक नाजूक, डौलदार आणि मन मोहवणारी कलात्मक वस्तू असे केलेले असते. अशा कविता ऐकायलाही खूप सुखावह वाटतात. पण खरेच स्त्री नाजूक आहे? असह्य अशा प्रसूती वेदना सहन करून नवीन जीव निर्माण करणारी स्त्री नाजूक कशी ? प्रसंगी हत्तीचे बळ आणून संसार उभारणारी व समोर आलेल्या संकटालाही लाजवेल एवढे धैर्य एकवटून त्याचा सामना करणारी स्त्री नाजूक नाही किवा मन मोहवणारी कलात्मक वस्तू नाही तर ती समाज घडवणारी शिल्पकार आहे .

आदिवासी स्त्रिया मुळातच काटक, जिद्दी , आणि भरपूर मेहनती .मग उगीचच लाचार होवून कोपऱ्यात का खितपत पडताय? आज आपल्यातल्या कित्येक भगीणींजवळ काहीना काही कौशल्ये असतात ,पण अज्ञान व संसाराच्या रहाटगाड्यात ते तसेच लयाला जाते. तुमचे कौशल्य ओळखून त्यांना वाव देण्यासाठीच मी आलेय . आपल्यातले धावण्याचे कौशल्य ओळखून व जीवनाचा खडतर प्रवासाचा सामना करून ऑलिम्पिक मध्ये स्वताचे व समाजाचे नाव उंचावणारी कविता राउत किंवा आपल्या चित्रांना जहांगीर कालादालानापर्यंत नेऊन पोचवणारी व आदिवासी समाज जीवनाची ओळख जगाला करून देणारी चित्रगंधा वनगा-सुतार हि आपल्यातल्याच आहेत हे विसरू नका ! मग आपण मागे का राहावे? सख्यांनो ,आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त प्राथमिक शिक्षण पुरेसे नाही, तर उच्च शिक्षणाची नितांन्त आवश्यकता आहे.उच्च शिक्षणाने यशाची नवी दालने तर उघड्तातच पण आपला आत्मविश्वासही उंचावतो ,आपल्यात एक नवीन धैर्य निर्माण होते.

शिका आणि शिकवा या उक्क्तीप्रमाणे आपण आपल्या सोबत समाजातील सर्व भगिनींना एकत्र आणून त्यांचे जीवनमान सुधारायचे आहे .हि आपली सामाजिक जबाबदारी आहे .शिक्षण आरोग्य ,संस्कृती ,पर्यावरण अशा काही प्रश्नांवर योग्य त्या चर्चेने उपाय योगून त्यावर अंमलबजावणी आहे.आपले शिक्षण व कौशल्य याचा उपयोग स्वताबरोबर समाजासाठी हि करून समाजाला नवी ओळख निर्माण करून द्यायची आहे . पण मी हे एकटीने नाही तर आपण सर्व भगिनींनी मिळून करायचे आहे .
मग येताय न सोबत.. नवीन व प्रगत आदिवासी समाज घडवायला !!....let us do it together !!!!

आम्ही आयुश’ च्या रुपानॆ हे कार्य करत आहोत. आयुश बद्द्ल थोडक्यात सांगायचे झालॆ तर
आयुश  म्हणजे आदिवासी तरुण एकत्र येऊन आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशा सोबतआपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या सामाजिक यशा साठी आणि सामाजिक जाणीव करून देण्याचे प्रयत्न करतो आहोत. आपल्या अखंड आदिवासी एकता टिकवून आपल्या समाजाचे ऋण परत करण्या साठीचा प्रामाणिक प्रयत्न.

आयुश च्या ह्या क्षितीजभरारीला तुमच्याही सहकार्याच्या पंखाचॆ बळ मिळावॆ अशी आम्ही आशा करतो  अन नक्कीच सर्वांच्या सोबतीनॆ समाजाला पुढॆ नेण्यास मोलाचॆ कार्य करु शकतो.मग देणार ना साथ?  

या समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्या साठी येथे टिचकी मारा – www.in.adiyuva.in
आयुश | let us do it together” विषयी अधिक माहिती साठी येथे टिचकी मारा – www.do.adiyuva.in

Google Group : https://groups.google.com/forum/?fromgroups#!forum/adikanya
Author @ Google

नेतृत्व गुण शिबीर आणि आदिवासी सशक्तीकरण कार्यशाळा



उदघाटन समारंभ : (संयुक्त कार्यक्रम -नेतृत्व गुण शिबीर आणि आदिवासी सशक्तीकरण कार्यशाळा )

कार्यशाळेचे उदघाटन माननीय एड्वोकेट चिंतामण वानग, आमदार (व माजी खासदार) यांच्या तर्फे युवा शक्तीचे प्रतिक म्हणून मशाल प्रज्वलित करून व आदिवासी समाजाचे आराध्य दैवत कणसरी पूजन करून करण्यात आले. आदिवासी विकास प्रकल्प डहाणू आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे आभार मानून कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुश अध्यक्ष श्री सचिन सातवी (इंजिनियर व सामाजिक कार्यकर्ता) यांनी केले. उद्घाटन सोहळ्यात श्री पांडुरंग बेलकर (माजी सभापती, समाज कल्याण, जिल्हा परिषद ठाणे) व एड्वोकेट काशिनाथ चौधरी (नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य) यांनी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, युवक युवतींना आयुश सारख्या व्यासपिठाची आदिवासी समाजाला गरज असल्याचे नमूद करून आदिवासींची सद्यस्थिती, समस्या व आपली भूमिका त्याचप्रमाणे अशा प्रशिक्षणाची आवश्यकता याबाबत संबोधित केले..

उदघाटन भाषणात आमदार चिंतामण वानग यांनी आयुश च्या नाविन्य पूर्ण उपक्रमाचा तपशील देवून आयुश प्रगतीची, गती, वाटचाल व यशाबद्दल अभिनंदन केले. युवक युवतींच्या हातात संपूर्ण राष्ट्र - समाजाचे भविष्य आहे, त्या मुळे काळाच्या ओघात, योग्य दिशेने, योग्य वेळी, उचित पूल उचलणे अतिशय महत्वाचे असून. त्या साठी माहिती, ज्ञान आणि सतत कष्ट करण्याची मनाची तयारी असणे असल्याचे नमूद केले. या साठी आयुश सारखे व्यासपीठ आदिवासींच्या सार्वभौम विकासासाठी, भविष्य काळासाठी गरजेचे व आवश्यक असून, आदिवासींची एकजूट, एकशक्ती व कृतीचे प्रतिक आयुश व्हावे या साठी सुभेच्छा दिल्या.

उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री वसंत भासरा यांनी केले. सूत्र संचालन निवेदनात श्री भासरा यांनी आदिवासींची विविध नावाखाली होणाऱ्या हेलसांडीचा निषेध करून, दिनांक १/३/२०१२ रोजी मुंबईच्या बातमीत "आदिवासी नरभक्षक" असा उल्लेख करणाऱ्या स्टार माझा या वृत्त वाहिनीवर न्यायालयीन खटला का चालवू नये? असा प्रश्न करून या वाहिनीचा निषेध केला. आपल्या गावामधील आदिवासी भूमिहीन होत आहे, गावातीलच दलाल लोकांच्या संगनमताने पैशेवले, शहरातल्या बड्या व्यक्तींच्या हाती कावडीच्या किमतीत जमिनी जात आहेत. हे कुठे तरी थांबवावं, अन्यथा आपण गुलाम आणि घरगडी- सालगडी म्हणून राबण्याच संकट दूर नाही अशी भीती-खंत व्यक्त केली.

व्यासपीठावर प्राध्यापक चेतन गुरोडा (मुंबई विद्यापीठ), प्राध्यापक सुनील भुसरा ( बांदोडकर महाविद्यालय विद्यालय, ठाणे), माननीय मुरलीधर बांडे, माननीय रघुनाथ महाले, आयुश अध्यक्ष्य सचिन सातवी उपस्थित होते. या कार्यशाळेचा लाभ डहाणू, तलासरी, विक्रमगढ,वाडा, पालघर, वसई तालुक्यातील एकूण ३० ते ३५ सरपंच / सदस्य / कार्यकर्ते व ३० ते ३५ युवक युवती यांनी घेतला. उद्घाटन सत्र नंतर लागलीच मार्गदर्शन सत्राला वेळा पत्रकाप्रमाणे सुरवात झाली .





See VDO at :

1)      Leadership Program :  http://youtu.be/DCIDeD32d60

2)      Tribal Empowerment program :  http://youtu.be/cW2jzvMjZoE



See Photograph at:


2)      Tribal empowerment Workshop :

AYUSH | feedback

about AYUSH [ marathi ]


आयुश विषयी काही

आयुश म्हणजे आदिवासी तरुणांनी एकत्र येऊन आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासोबत, आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या सामाजिक यशासाठी आणि सामाजिक जाणीवा करून देण्यासाठी उभारलॆलॆ एक हक्काचॆ मुक्तव्यासपीठ आहॆ. जिथॆ तुम्ही तुमच्या विचारांची मुक्तहस्तानॆ दॆवाणघॆवाण करु शकता अन आपल्याकडॆ असलॆल्या कौशल्यांचा उपयोग आपल्या समाजासाठी कसा करता यॆईल याचा तपशील मांडु शकता.

आपले ध्येय
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणारे वैयक्तिक, समुह किंवा संस्था यांना एकत्र आणून त्यांच्या मदतीने आदिवासींचा विकास करणे
- वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना एकत्र आणून त्यांचे अनुभव आणि ज्ञान वाटण्या साठी ज्ञानाचे जाळे बनविणे
- ज्ञानाच्या जाळ्याचा उपयोग करून ग्रामीण विद्यार्थ्यांना मदत / मार्गदर्शन करणे
- ग्रामीण विद्यार्थांना व्यवसाय आणि शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि मदत करणे
- आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन आयुष्यात आणि समाजोन्नती च्या कामात करून घेण्याकरीता जागरुकता निर्माण करणे
- शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना सोबत आणणे आणि सध्याच्या तसेच भविष्यातील स्पर्धेची ओळख करून देणे
- आदिवासी तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि भविष्यात सामोऱ्या जावा लागणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांना तयारकरणे
- पारंपारिक कला आणि संस्कृती यांविषयी जागरुकता निर्माण करणे आणि सध्याच्या जीवनमाना नुसार पारंपारिक कला आणि संस्कृती ह्यांचे जतन करणॆ आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे.
- जाती भेद आणि पंथ भेद रोखणे आणि अखंड आदिवासी समाजा ची एकता टिकवणे
- परावलंबी पण नाहीसा करून आदिवासी तरुणांना स्वावलंबी बनविणे

आपली दृष्टी
आदिवासी संस्कृती जपूया
यु युवकांनो एकत्र येऊया
शक्ती एकवटून जगाशी भिडूया
आयुश का ?
आपल्या समाजात अनुभवी, हुशार, होतकरू असे बरेच लोक आहेत. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग आपल्या समाजातील गरजूंना करीता करुन घेण्यासाठी
- आपल्या समाजातील बरेच लोक विविध शहरात राहतात, पण अशा लोकांचा गावासोबतचा संबंध तुटत चालला आहे अशा लोकांचा गावासोबत संबंध प्रस्थापित करणे तसेच ग्रामीण भागातील किंवा समाजातील समस्या सोडविण्यात त्यांना सहभागी करुन घेणे
- ज्या लोकांना आपल्या समाजासाठी काही करण्याची इच्छा असते. अशा लोकांसाठी खास आदिवासी समाजासाठीचे स्वतंत्र आणि आजच्या काळा नुसार ध्येय आणि उद्देश असलेले योग्य व्यासपीठ म्हणुन काम करणे.
आपण कसे करणार?
- वेगवेगळ्या लोकांना जोडणे [ मेल, ब्लोग्स, संकेतस्थळे, सामाजिक जाळे, चर्चा आणि समूह, internet, sms चा उपयोग करून]
- वेगवेगळ्या चर्चा आणि संवाद आयोजित करणे [ अनुभवी माणसे, विद्यार्थी, व्यावसायिक, प्रतिष्ठीत इ ]
- सामाजिक, शैक्षणिक, व्यवसाय मार्गदर्शन, सांस्कृतिक तसॆच इतर अनॆक असे विविध कार्यक्रम भरवणे
- जेणेकरुन अश्या कार्यक्रमांद्वारे आदिवासी तरुणांमध्यॆ आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांना आपले ध्येय पूर्ण करण्यास मदत होईल

कोण करणार?
- संपर्कात असलॆल्या विविध माणसांकडून आपल्या ध्येय पुर्तीसाठी मार्गदर्शन आणि सहकार्य अपेक्षित आहे ज्याचा उपयोग करुन आपण समाजविकासाच्या कामांना गती देवू शकतो
- संपर्कात आलेल्या ग्रामीण भागातील तरुणांकडून विविध कार्यक्रम आयोजित करणॆ .

संपर्कात या
- जर आपणाला सोबत यावेसे वाटत असेल तर जरूर मेल करा
- आपले ध्येय आहे सगळ्या आदिवासी पर्यंत पोहोचणे, म्हणून आणखीन लोक जोडण्यास आपले सहकार्य अपेक्षित आहे.
चला सोबत करूयात
- आयुश च्या कार्यात मदत/सहकार्य करू इच्छित असणाऱ्यांचे स्वागत आहे, अधिक माहिती साठी "support us " मध्ये आयुश च्या संकेत स्थळावर पहा
AYUSH - ensuring tribal success
www.adiyuva.in | ayush@adiyuva.in
Author @ Google

सुसरी धरण विरोधी संघर्ष समिती

सुसरी नदीवर धरण होऊ देणार नाही, होवू देणार नाही
जाहीर सभा
ठिकाण कासा केंद्र दिनांक ९ ओक्ट २०११ रोजी सकाळी १० वाजता
सुसरी नदीवर नियोजित धरण प्रस्थावित आहे. या धारणा मुळे मौजे रानशेत, आवढाणी, महालक्ष्मी, धानिवरी , दहीगाव, ओसुर, असरविरा, नवनाथ आणि गनेशबाग (रानशेत) येथील आदिवासींच्या जमिनी व वनजमिनीचे सुमारे १००० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. या धरणातील ५४ दश लक्ष घनमीटर पाणी पाईप लाईन द्वारे वसई, विरार व नवघर माणिकपूर व नालासोपाऱ्याला नेण्यात येणार आहे. या धरणाला आमचा प्रखर विरोध आहे. आजवर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा सारख्या प्रकल्प द्वारा मुंबई ला पाणी नेण्यात येऊन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील पाण्याची लुट करण्यात आलेली असून तेथील प्रकल्प ग्रास्तांचे पुनवर्सन झालेले नाही आणि आता मुंबई उपनगरे या भागात राहिलेल्या पाण्याची साधने हडप करू पाहत आहे. यातून आदिवासी साठी काहीही शिल्लक राहणार नाही.
म्हणूनच आतापर्यंत झाले इतके पुरे झाले, असे सरकारला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. या पुढे आदिवासी नियोजनहित नागरीकरणाचा बोजा सहन करणार नाही. दूरवर आदिवासी भागात धरण बांधण्या एवजी वसई तालुक्यात असलेल्या पाण्याच्या स्त्रोताचा वापर करायला हवा. सिडकोने या साठी कामन, खोळ्सा पाडा, उसगाव, सातिवली, इत्यादी जागा सुचविल्या असून या ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोताचा वापर केला गेल्यास. दर दिवशी १२४ एम एल डी एव्हडे पाणी उपलब्ध होवू शकेल असे म्हटले आहे. सुसरी धरणात मिळणाऱ्या पाण्या पेक्षा हे मिळणारे पाणी किती तरी पटीने अधिक असेल या खेरीज पाईप लाईन तसेच बांधकाम खर्चाचीही बचत होवू शकेल. मात्र ठेकेदारांच्या लॉबीला बळी पडत सरकारने या सुचणे कडे दुर्लक्ष केले आहे. आमच्या भागातील काही राजकारणी लोकांनी आदिवासी कल्याणाचा विचार करण्या एवजी या धरणाचे समर्थन करत स्वतःची तुंबडी भरण्याच्या उद्देशाने मागे लागले आहेत.
आमच्या नद्याचे पाणी आमच्या मालकीचे आहे त्याच्या वापरावर आमचा अधिकार आहे आम्हालाच जर पिण्या साठी पाणी नाही तर आम्ही येथील पाणी वसई विरार ला का पाठवावे ? आणि त्यात तर शहराच्या मागण्या रोज वाढत आहेत. तसेच शहरी भागात दर माणसी पाण्याचा वापरही जास्त केला जातो. शहराच्या नवीन वसाहतींच्या गरजा भागवण्य साठी अधिका अधिक धरणे बांधली जातील. वसई विरार मधली बिल्डर लॉबीने चालविल्या नियोजनशून्य आणि अनिर्बंधित वाढीमुळे येथे पाण्याची कमतरता भासत राहणार आहे. सूर्या प्रकल्पाचे पाणी आदिवासींची शेती फुलाविन्या साठी दिले जाणार होते परंतु ठेकेदारांनी पद्धतशीर पणे वसई विरार सारख्या योजना मधून हे पाणी अन्यत्र कसे वळवता येयील हे काम केले आहे. आदिवासी भागाचे वसाहतीकरण आणि त्यांचे पाणी इत्तर साधनांनी लुट या पुढे थांबवा असे सरकारला सांगण्यासाठी कासा येथे एकत्र जमायचे आहे.
सुसरी धरण विरोध संघर्ष समिती
अध्यक्ष : श्री नरेश हाल्या बोलाडा
उपधक्ष्य : श्री चंदू सोनू वरठा
सचिव : श्री देविदास नंदकुमार तल्हा
खजिनदार : श्री सुरेश बाबू कडू

NGO : Adivasi Yuva Seva Sangh

Hello Friends! 
We are Registered Voluntary Organization (NGO), under Society Registration act 1860.

Registred Organisation Name : Adivasi Yuva Seva Sangh
Act : Society Registration Act 1860


Registration No.:MH/877/11/Thane

NITI Ayog Portal Unique Id of NGO:MH/2011/0041398


Ref : http://ngo.india.gov.in/view_ngo_details.php?ngo_id=adiyuva


Note : 
1. Online activities started in 2006, with "Adivasi Yuva Shakti" name. Will continue with same. 
2. Registration authority approved name "Adivasi Yuva Seva Sangh" for registration in 2011

Happy shimaga & holi!

आपल्या भारतात सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. भारताच्या सर्वच प्रदेशात सणांचे आगळेवेगळे वैशिष्टपुर्ण रुप आपणांस पहावयास मिळते.प्रत्येक प्रदेशाच्या चालीरीती,भाषा,तेथील संस्कृती यांनुसार सण साजरे करण्याच्या पद्धतीही भिन्न भिन्न आहेत.
आपल्या येथील सणांच्या मांदीयाळीतील एक वैशिष्टपुर्ण सण म्ह्णजे "होळी".
हा सण फार पुर्वीपासूनच मोठया आनंदात अनं उत्साहाने साजरा केला जातो.ग्रामीण भागात तर ह्या सणाला मोठया उत्सवाप्रमाणे साजरा करतात. ग्रामीण भागात तर "एक गाव एक होळी" अशीच प्रथा आजपण आहे. होळी पेटविण्याच्या निमित्ताने सर्व गावाने एकत्र यावे हा यामागचा मुख्य हेतु.होळीची एक मजेशीर गंमत आहे बघा! इतर सणांना आपण मंगलमय वातावरण तयार करत असतो पण या सणाला चक्क होळीच्या भोवती फ़िरुन सर्वजण बोंब मारत असतात. हे करण्यामागचा एकच उद्देश की होळी हा सण समाजातील वाईट प्रवृत्ती आणि दुर्गुंण नाश करण्यासाठी असतो. अमंगल ते जाळायचं आणि अनिष्ट अशा गोष्टींच्या नावानं बोंब ठोकायची.
आदिवासी संस्कृतीत तर हा सण अगदी छानश्या पद्धतीने साजरा केला जातो.लहान होळी आणि मोठी होळी अश्या दोन टप्यात हा सण साजरा केला जातो. लहान होळीच्या दिवशी पाड्यातली लहान मुले एकत्र येऊन लहान लहान सुकलेली लाकडे गोळा करून लहानशी होळी करून तिच्याभोवती नाचतात. म्हणूनच बहुतेक याला लहान होळी असे म्हणतात. ह्या दिवशी तांदळाच्या पापड्या करतात अनं उन्हात सुकत घालतात. नंतर त्या पापड्या घरात ठेवल्या जातात.लहान होळीच्या आदल्या दिवशी घरातले सगळेजण एकत्र बसून आंबा खातात, याला आंबा खाणे असे म्हणतात, या नंतर सगळे जण औपचारिकतेने आंबा खायला सुरवात करतात. दुसऱ्या दिवशी मोठ्या होळीला गावातील सगळी माणसे वाळलेली लाकडे गोळा करतात.गावातील सगळी माणसे एकत्र जमल्यानंतर पूजेला सुरवात होते, होळीची पुजा गावातील भगतांकडून केली जाते. गावकरी घरी बनविलेले तांदळाचे पापड नैवद्य म्हणुन घेऊन येतात. पूजा झाल्यावर होळीला अग्नी दिला जातो. असे मानले जाते की वाईट प्रथा आणि वाईट सवयींचे होळीत दहन केले जाते.
अजुन एक छानशी रीत ह्या सणाच्या निमित्ताने असते ती अशी की ह्या वर्षी नवीन लग्न झालेले दांम्पत्य होळी भोवती प्रदक्षिणा घालुन नाचतात. होळीच्या सुरवातीस अर्पण केलेले नारळ अग्नी मुळे भाजून बाहेर येतात, ते गरम नारळ प्रसाद म्हणून वाटले जातात. पारंपारीक गाणी म्हटली जातात. आणि त्यानंतर सगळे जण आपल्या घरी परतून पापड्या टाळायला सुरवात करतात. होळीच्या दिवशी तयार केलेल्या पापड्यांना ह्या दिवशी विशेष महत्व असते त्यामुळे प्रत्येक घरात त्या बनविल्या जातात, इतर ठिकाणी धिंडऱ्या, भाकरी इत्यादी बनविले जाते. लहान होळीच्या दिवशी शिमगा खेळला जातो, एकमेकांच्या अंगावर पाणी/भेंडीचा रंग लावला जातो. त्या दिवशी गावातील काही लोक सोंग घेऊन, वेग वेगळे रूप घेऊन, नाच करून पोसत / फगवा गोळा करतात आणि त्यानंतर एकत्र बसून मेजवानी केली जाते. शिमग्याच्या दिवशी अशी प्रथा आहे की शेजाऱ्यांची एखादी वस्तू लपवायची, प्राथमिकता कोंबडा लपवण्यास दिला जातो, म्हणून ह्या लहान होळीला ’कोंबड होळी’ असेही म्हटले जाते. लहान मुलांना विविध नाच आणि सोंगकरण्या साठी एक प्रकारची पर्वणीच असते.
आपल्याकडे होळीला उत्तरभारतासारखे रंग खेळले जात नाहीत. त्याऎवजी धुळवड(धुलिवंदन) आणि रंगपंचमीला रंग खेळले जातात. रंगपंचमीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जीवनातले वाईट रंग झटकून देवून नवीन उमेदीच्या रंगाने रंगून जावे तसेच एकमेकांमधील व्देषाचा रंग घालवून परत एकदा एकमेकांना प्रेमाच्या, आपुलकीच्या,मैत्रीच्या रंगात रंगवावे हाच या मागचा उद्देश.
आपलॆ हॆ पुर्वापार चालत आलेले सण,उत्सव प्रत्येक सणांमागील विविधपद्दती आपण जपल्या पाहिजेत.आधुनिकीकरणाच्या या युगात आपल्या उत्सवांचा तोच थाट, तीच शैली आपण जपली पाहिजे. अनं हे उत्सव किती मंगलमय वातावरणात सर्वांच्या सोबतीने आपण साजरे करु यांकडे लक्ष पुरविले पाहिजे.
पण हे सर्व करत असतांना काही महत्वाच्या बाबींकडॆ ही आपण लक्ष दिले पाहिजे. जसे की,होळीच्या निमित्ताने दरवर्षी बेसुमार वृक्षतोड केली जाते. आपल्या काही क्षणांच्या आनंदासाठी कितीतरी वृक्षांचा आपण बळी देत असतो ही वृक्षतोड थांबवून आपण होळीसाठी वाळ्लेली लाकडॆ वापरली पाहिजॆत.’एक गाव एक होळी’ यांसारख्या संकल्पना रुजविल्या पाहिजेत.जेणेकरुन एकाच गावात अनेक होळ्या साजऱ्या करतांना वापरली जाणारे लाकडे वाचतील.धुळवड(धुलिवंदन),रंगपंचमी ह्यासारख्या सणांना रंग खेळायला हरकत नाही पण रंगामुळे डोळे,कान,नाक यांना अपाय होत असेल तर तो रंगांचा बेरंग नाही का?रंगातल्या रसायनांमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते क्वचित अंधत्व येऊ शकतं त्वचेचा आजारही जडू शकतो.हे सर्व टाळण्यासाठी कृत्रिम रंगाऎवजी नैसर्गिक रंग वापरले पाहिजेत.

आपण जर अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर आपल्या आनंदाला कुठेही गालबोट लागणार नाही आणि आपण आपले सणवार अशाच मोठ्या उत्सहात, दिमाखात साजरे करु शकू. अश्याच आनंदमय अन मांगल्यमय वातावरणात यंदाची होळी इकोफ़्रेन्ड्ली साजरी करण्यासाठी आम्ही आयुशच्या वतीने प्रयत्न करत आहोत.
मग देणार ना साथ?
अधिक माहितीसाठी संपर्क साधा. ayush@adiyuva.in
AYUSH let us do it together – www.do.adiyuva.in

दोन मिनीट वॆळ आपल्याला, आपल्यासमाजासाठी काही करण्यासाठी?

नमस्कार!
दररोजच्या या धकाधकीच्या जीवनात आहॆ दोन मिनीट वॆळ आपल्याला,
आपल्यासमाजासाठी काही करण्यासाठी?

अजुन किती दिवस आपण आरक्षणाच्या कुबड्यांवर आपली प्रगती साधणार आहोत?
का नाही प्रगतीसाधत आम्ही स्वताच्या कर्तृत्वावर? आरक्षणाचा फ़ायदा मात्र सर्वजण उचलतो मात्र ज्या समाजामुळॆ हॆ आरक्षण मिळत आहॆ त्याच्या प्रती आपलॆ काही कर्तव्य आहॆ हॆ विसरत चाललो आहोत. हक्काची टिमकी वाजवणारॆ आपण, आपल्या कर्तव्याकडे मात्र सपशॆल पाठ फ़िरवतो.

आपण आदिवासी निसर्गाचे राजॆ....
अनं तो निसर्ग आणि त्याचा विकास करण्याची जबाबदारीही आपलीच आहॆ. माझी संस्कृती जॆ माझ्या मनाचॆ प्रतिक आहॆ,माझी आदिवासी संस्कृती जी विविधतॆनॆ नटलॆली आहॆ त्या संस्कृतीचे जतन करण्याची सर्वस्व जबाबदारीही माझीच आहॆ,ही भावना आपल्या प्रत्यॆकाच्या मनात असली पाहीजॆ.

आजकालच्या ह्या शहरीकरणात निसर्गाचा समतोल कुठॆतरी बिघडत चालला आहॆ.ह्या शहरीकरणात आपली संस्कृती हरवुन जावू नयॆ म्हणून आपणच प्रयत्न कॆलॆ पाहिजॆ. पिढ्यानपिढ्या चालत आलॆल्या परंपरांचे हॆ दॆणॆ आपणही आपल्या पुढच्या पिढीला दिलॆ पाहिजॆ,
यॆणारया नवीन पिढीला आपल्या चालीरीती,भाषा अनं विविध गोष्टींची माहिती आपणच दिली पाहिजॆ आणि आपल्या संस्कृतीचॆ जतन कॆले पाहिजॆ.
मी दररोज ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे माझ्यावर अनन्य उपकार आहॆत.त्यांच्याप्रती आपली उद्दात भावना असली पाहिजॆ मी ह्या समाजाचा ऋणी आहॆ. मी समाजाचॆ काही दॆणॆ लागतो ह्या गोष्टीची जाणीव झाली तर नक्कीच आपण विधायक कामॆ करु शकतो.

आपण स्पर्धॆत धावत धावत पुढॆ आलो आहोत कुठॆतरी यशस्वीही झालो आहोत अन् अजुनही प्रगतीपथावर वाटचाल करत आहोत.
पण त्यांचॆ काय? ज्यांना अजुनही प्रगतीच्या गावचा रस्ताही माहीत नाही.अशा आपल्याच लोकांचे वाटाडॆ होण्याची जबाबदारीही आपलीच आहॆ
एक सामाजिक बांधिलकी म्हणुन तरी. आपलॆ कितीतरी समाजबांधव अजुनही मागॆच आहॆत.त्यांनाही आपल्याला प्रवाहाबरोबर आणायचॆ आहॆ.
त्यांच्या डोळ्यात असणारया स्वप्नांना नवचैतन्याची सुखाची पहाट आपणाला दाखवायची आहे.
हॆ करतांना एकटयानॆ चालून उपयोग नाही तर ’एकमॆकासह्हाय करु अवघॆ धरु सुपंथ’ ह्या उक्तीप्रमाणॆ कार्य करावॆ लागॆल

आपण ’आयुश’ च्या रुपानॆ हे कार्य करत आहोत. आयुश बद्द्ल थोडक्यात सांगायचे झालॆ तर.....
आयुश म्हणजे आदिवासी तरुणांनी एकत्र येऊन आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासोबत, आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या सामाजिक यशासाठी आणि सामाजिक जाणीवा करून देण्यासाठी उभारलॆलॆ एक हक्काचॆ मुक्तव्यासपीठ आहॆ. जिथॆ तुम्ही तुमच्या विचारांची मुक्तहस्तानॆ दॆवाणघॆवाण करु शकता अन आपल्याकडॆ असलॆल्या कौशल्यांचा उपयोग आपल्या समाजासाठी कसा करता यॆईल याचा तपशील मांडु शकता.
थोड्क्यात आपली अखंड आदिवासी एकता टिकवून आपल्या समाजाचे ऋण फ़ॆडण्यासाठी कॆलॆला हा प्रामाणिक प्रयत्न.

आयुश च्या ह्या क्षितीजभरारीला तुमच्याही सहकार्याच्या पंखाचॆ बळ मिळावॆ अशी आम्ही आशा करतो
अन नक्कीच सर्वांच्या सोबतीनॆ समाजाला पुढॆ नेण्यास मोलाचॆ कार्य करु शकतो.
मग देणार ना साथ?

या समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्या साठी येथे टिचकी मारा – www.in.adiyuva.in
आयुश विषयी अधिक माहिती साठी येथे टिचकी मारा – www.do.adiyuva.in

AYUSH picnic cum get together Jan 2011

Find us on Facebook