आदिवासी जीवनशैली आणि शिक्षणाचे महत्त्व
“Adivasi is not only a word ; But it’s a culture, community, symbol of identity, hope, dream, reality, origin of being, wisdom, truth but yet invisible for the world……..and simply a lifestyle of tribals”.
-Raju Thokal.
‘आदिवासी‘ या नावावरून भारतात हा समाज फारपुरातन कालापासून राहणारा समाज आहे. डोंगरकुशीत राहिलेल्या या समाजाने इतरसमाजांच्या वाहत्या प्रवाहांपासून स्वतःला दूरच ठेवले. त्यामुळे आधुनिकविकास, साधनसामुग्री, यंत्रे, शिक्षण, आरोग्याच्या सोयी-सुविधा, यांच्याशीत्यांचा संपर्क बरीच वर्षे आलाच नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काहींनीतो जाणीवपूर्वक येवू दिला नाही. तर काहींना आदिवासींचे हेदारिद्र्य….आदिवासीपण म्हणजे आपले भांडवल वाटत होते आणि आजही अपेक्षितअसा बदल याविचारसरणीत झालेला दिसत नाही. याला काही आदिवासी नेते, अधिकारी, विविध क्षेत्रात काम करत असणा-या व्यक्तीसुद्धा अपवाद नाहीत. आपले स्वताचेघर उभारण्यासाठी काहींनी अगदी उघड्या डोळ्यांनी हजारो आदिवासी समाजबांधवांची घरे बरबाद करण्याचे पातक केले. आपला भविष्यकाळ उज्ज्वलकरण्यासाठी काहींनी आदिवासींचा सुवर्णकाळ पायदळी तुडविण्याचे कामकेले…..आजही आपण डोळसपणे आदिवासी समाजाच्या सद्यस्थितीचा विचार केला तरआश्वासक असे चित्र आपण सापडणार नाही. सध्याच्या राजकीय, शैक्षणिकघडामोडींचा विचार केला तर हे चित्र न बदलण्यातच काहींचे हित सामावलेले दिसतआहे. एकंदरीत शासन, धर्मदायी संस्था व इतर समाजाकडूनही आदिवासी समाजदुर्लक्षितच राहिला आहे. तसे नसते तर मग शिवाजी महाराजांच्या गौरवशालीस्वराज्यामध्ये अनेक आदिवासी मावळ्यांचा इतिहास आज आपणास दिसलाअसता….भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये इंग्रजी हुकुमतीला शह देणा-या अनेकआद्य क्रांतिकारकांचा आज इतिहास आपण पुजला असता. परंतु लेखकांपासूनहीआदिवासी वंचितच राहिला. आदिवासींना जरी ‘अस्पृश्य‘ मानलेले नसले तरी पणसामाजिक प्रतिष्ठा मात्र त्यांना मिळालेली नाही.
अहमदनगर, पुणे, ठाणे, नागपूर, मुरबाड, मावळ, नाशिक, नंदुरबार अशा विविध भागातभटकंती करत असताना आदिवासी समाजाच्या जीवनशैलीचा मला अधिकच उलगडा होत गेला.शैक्षणिक कामानिमित्त फिरत असताना अनेक आदिवासी गावांमध्ये आदिवासीपालकांसोबत चर्चा करण्याची संधी मला अनेकदा मिळाली.आदिवासी गावांतीललोकांच्या राहणीमानाचा जवळून आस्वाद घेता आला. फणसासारखी बाहेरून काटेरीदिसणारी माणसे आतून किती गोड असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मी स्वतःजरी आदिवासी असलो, तरी शिक्षणासाठी कायम घरापासून, समाजापासून, गावापासूनदूर होतो. त्यामुळे आदिवासी संस्कृती, जीवनशैली, राहणीमान यांपासून मी काहीप्रमाणात वंचित राहिलो. आज माझ्या भटकंतीच्या छंदामुळे यासर्व बाबी पुन्हाजगण्याची संधी मला मिळाली. तसेच आदिवासी समाजाच्या अडचणी, आव्हाने या बाबीअभ्यासण्याची जाण माझ्या आदिवासी मनाला झाली.
अज्ञान, दारिद्र्य यांनी ग्रासलेल्या, आधुनिक प्रगतीच्या संपर्कापासून आजहीसर्वदूर असलेल्या या आदिवासी पाड्यांपर्यंत आज मेड इन चाईना मोबाईल मात्रमला दिसला. जेमतेम वरण भात, कंदमुळे, रानातली फळे, भाज्या यावर गुजराणकरणा-या असंख्य समाजबांधवांना आपल्या जीवनातील या उणिवांची जाणीवहीनसल्याचे चित्र मला दिसले. उलट आपण जंगलात राहतो याचा पुरेपूर अभिमानकाहींच्या चेह-यावर दिसला, तर काहींनी त्याबाबत खंत व्यक्त केली. परंतु५०-६० वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात खूप फरक पडलेला आहे असे काहीजाणकार व्यक्तींच्या मुखातून आशादायक शब्द बाहेर पडलेले मला ऐकायला मिळाले.
प्रत्येकाचाजीवन जगण्याचा आणि आपल्या सभोवतालची परिस्थिती अभ्यासण्याचा एक स्वतंत्रदृष्टीकोन असतो. माझ्या वैयक्तिक दृष्टीकोनातून जेव्हा मी आश्रमशाळांच्याभूमिकेचा आजपर्यंतचा अभ्यास करतो, तेव्हा ज्ञानाची दीपज्योत या आदिवासीसमाजापर्यंत पोहचविण्याचे पवित्रच नव्हे तर दैवी काम आश्रमशाळांनी केलेलेआहे. आश्रमशाळांच्या अस्तित्वामुळेच मी शिक्षणाच्या महासागरात आपलीज्ञानाची तहान भागविण्यासाठी उतरू शकलो…काही तरी जीवनाला आकार देवू शकलो.आदिवासी समाजातील व्यक्तींनाही लाजवेल अशी नैपुण्यपूर्ण कामगिरी आमच्यागुरुजनांनी केलेली आहे. याचे प्रत्यंतर या आदिवासी भागात गेल्याशिवाय आपणासयेत नाही.
प्राचीनकालापासून आदिवासींचे वास्तव्य असूनही आज स्वताची शेती वाचविण्यासाठीआदिवासींना सरकार दरबारी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातही स्वताची शेतीअसणारे आदिवासी बांधव बोटावर मोजण्या इतकेच शिल्लक आहेत. ज्यांची जमीन आहे , त्यांचीही २-३ एकर डोंगरावर-खडकाळ माळरानावर. त्यामुळे यातून मिळणा-यातुटपुंज्या उत्पन्नाच्या मदतीने कुटुंब, मुलांचे शिक्षण, आरोग्य, राहणीमानयावर होणा-यासाठी खर्चासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रसंगीमजुरीसाठी इतरत्र स्थलांतर करावे लागते. त्यातही मजुरीसाठी जी कामे मिळतातती सारी प्रासंगिक असतात. त्यामुळे आदिवासींच्या जीवनाला आर्थिक स्थैर्यनाही.
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत आणि शिक्षण व वैद्यकीय सेवाह्या सुसंस्कृत समाजाच्या गरजा आहेत. या सर्व बाबतीत आदिवासींचा फक्तनिवा-याचा प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आपणास दिसतो. फार वस्ती नसलेल्यादूरदूरच्या प्रदेशात या समाजाचे वास्तव्य असल्याने रानातून लाकडे, कारवी, झावळ्या, झाडाची पाने आणून मोकळ्या जमिनीवर झोपड्या उभारण्याचे कामस्वताच्या श्रमावरच आपले घर उभारण्याचे काम केले जाते. पण या कामात व्यस्तअसताना वर्षातील काही महिने उपासमार सहन करण्याची वेळ अनेक कुटुंबांवरयेते. स्त्रीचे अंग जुन्या पण फाटक्या लुगडयाने झाकलेले असते. गरीब घरातीलपुरुषांचीही तीच अवस्था असते. लहान मुले तर उघडी-नागडीच फिरत असतात. झोपडीतडोकावले तर एखादी जुनी वाकळ, बाज, पाण्याची व स्वयंपाकाची जेमतेम भांडीघडवंचीवर ठेवलेली…..एवढेच सामान. त्यात अजून भर असते ती गोधड्यांची.अलीकडे शिकलेल्या, शिक्षक, साहेब, कारकून, शिपाई म्हणून कुठेतरी ‘चाकरी‘ की ‘नोकरी‘ करणा-या लोकांच्या घरात स्टीलची भांडी, ब-यापैकी कपडे, टी.व्ही….., काहींचा गावातील एकमेव दुरून नजरेत भरणारा टुमदार बंगला वत्यासमोर चारचाकी, दोबचाकी वाहने दिसत आहेत. परंतु हे चित्र खूपच कमी आहे.आदिवासी समाजाला या शिक्षित वर्गाकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. परंतुखेदाची बाब म्हणजे या नोकरदार मंडळींनीसुद्धा आदिवासी सामाजाकडे पाठफिरविली आहे.
प्राचीन काळापासून आदिवासी समाजावर अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार करण्यात आले आणि आजही हे वेगवेगळ्या स्वरूपात सुरूच आहे. कधी धरणासाठी जमीन पाहिजे म्हणून तर कधी आपली जमीन वनविभागाच्या अंतर्गत येते असे म्हणून भूमिहीन करूनही अनेक अत्याचारांना आदिवासींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षणाच्या अभावामुळे त्याविरुद्ध पाहिजे तसा कोणी आवाज उठविला नव्हता; परंतु सध्या कासा, तलासरी याभागात लोकांनी एकत्र येवून अशा प्रकारे अन्यायाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अन्यायाचे अनेक पाठ आपल्या समोर असतानाही सुशिक्षित आदिवासी हे सर्व आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतो आणि गप्प बसतो हि सुद्धा खेदाची बाब नव्हे काय?
स्वच्छतेच्या बाबतीत आदिवासींची घरे किंवा झोपड्या शेणाने सारवलेली आपणास दिसतील. शहरी वातावरणापलीकडे कदाचित हे चित्र आज तरी डोळे मोठे करून पाहण्यासारखे आहे. त्यात जर आपण डहाणू परिसरात गेलात आणि एखाद्या घराच्या भिंतीवर वारली चित्रकला दिसली तर या समाजाचा जीवन जगण्याचा निव्वळ स्वच्छंदी नैसर्गिक दृष्टीकोन आपणास दिसेल. घराच्या समोरच मोठे प्रशस्त अंगण अन तेही शेणाने सारवलेले असते. कोठेही घाण दिसणार नाही. परंतु आरोग्याबाबत अज्ञान आणि अंधश्रद्धा दोन्हीही आड येतात. मुलांना खरुज असण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. अगदी शाळांमध्ये जाणा-या विद्यार्थ्यांमध्येही हे प्रमाण आपणास दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे सकस आहाराची उणीव होय. यावर उपाय म्हणून सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जातात. उदाहरणार्थ आदिवासी लोकसंख्या असणा-या भागात आश्रमशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच सकस आहाराची सोय करणे अपेक्षित असते. परंतु आज काळ बदलला, विज्ञानाने प्रगतीची पावले वेगाने धावायला लागली. या प्रमाणात आज ज्या सोयी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे त्या आपणास दिसत नाहीत. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून विविध बाबींवर प्रकाश टाकणारे वृत्त नियमित प्रसिद्ध होत असते. त्यातून यातील भयानकता, विदारकता दिसून येते.
आदिवासी समाजात सर्व धार्मिक, सामाजिक, आनंदाच्या, दुखाच्या प्रसंगात दारूला फार महत्त्वाचे स्थान आहे. लग्न असो किंवा गावाचा उरूस असो, महत्त्वाच्या माणसांना दारू पाजणे, झिंगून नाचत राहणे या गोष्टी इतक्या सर्रास आहेत कि त्यामुळे समाजात व्यसनाधीनता फार वाढली आहे. आदिवासींना व्यसनमुक्त करणे हे अतिशय कठीण काम आहे. दारू न पिणारा पुरुष सापडणे फारच कठीण. पण काहीही असो मुला-बाळांचा त्यांना कधी विसर पडत नाही. त्यांना व्यसनांपासून दूर नेण्यासाठी जनजागृतीविषयक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे आहे.
आदिवासी लोकांना जंगलाचे भारी प्रेम आहे. अशी हि सदाफुलीसारखी सदैव हसणारी, फुलणारी आपली माणसं जवळून पाहिली कि अनेकदा मनात विचार येतो, ही गुणी माणसे अशीच का रानावनात कोमेजून जाणार ? त्यांच्या गुणांचा सुगंध बाहेरच्या जगाला कधीच नाही का जाणवणार? त्यांच्या गुणांची पारख, कदर जगाला कधीच नाही का करता येणार? आज या संगणकाच्या युगातही अज्ञानाचा अंधकार पसरलाय….ज्ञानाचा प्रकाश त्यांना केंव्हा दिसणार?
अज्ञानाच्या अंधकारात बुडालेले, मागासलेपणाच्या भोव-यात सापडलेल्या आदिवासी जनतेपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचविण्यासाठी आश्रमशाळांबरोबरच महाविद्यालये, तंत्रनिकेतने, व्यावसायिक शिक्षण संकुले, क्रीडा प्रबोधिनी, व्यायामशाळा, व्यावसाय मार्गदर्शन मंच, स्पर्धा परीक्षा केंद्रे आदि शैक्षणिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. यातूनच आदिवासींच्या उद्याच्या नवनिर्माणाचे भवितव्य घडेल. सक्तीचे व मोफत शिक्षण असूनही ‘झाडांची पाने गळावित तशी शाळेतून लेकरं टपाटपा गळत आहेत’ हे चित्र बदलण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे.
आजचा आदिवासी समाज असंतोषाच्या ज्वालामुखीवरच उभा आहे. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची आधुनिक बीजे लावणे अधिक महत्त्वाचे आहे. परंतु जागोजागी आधुनिक शिक्षणसम्राट किंवा शिक्षणमहर्षी यांची आलिशान, अत्याधुनिक साम्राज्ये निर्माण झाली आहेत. यात ब-याच मोठ्या प्रमाणात आजचा विद्यार्थी होरपळून जात निघत आहे. म्हणून इथे आजच्या शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळेत आदिवासींची मुले शिक्षण घेण्यासाठी येत असतील तर त्यांना शिक्षणाचा योग्य न्याय मिळवून देण्याचे काम शिक्षकाने करणे गरजेचे आहे.
आदिवासींमध्ये शैक्षणिक क्रांति हवी असेल तर आवश्यकता आहे शिक्षकांनी जबाबदारी स्वीकारण्याची. केवळ अभ्यासक्रम बदलून क्रांति येणार नाही किंवा मोफत शिक्षण देवूबाही क्रांति होणार नाही, तर शिक्षकांची फक्त हुशार मुलांकडून उत्तरे मिळवून, पान पळटी करून, धडा दुसरा करून, स्वताची समजूत काढण्याची वृत्ती बदलाने आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये असणारा नेतृत्वगुणांचा अभाव, वाढणारी बेशिस्त, गैरहजेरीचे वाढते प्रमाण, अभ्यासाकडे दुर्लक्ष्य करण्याची प्रवृत्ती, वक्तशीरपणाचा अभाव, अनैतीकपणाचा स्वीकार आणि नेमून दिलेले काम पूर्ण करण्याची वृत्ती यांची कारणे शोधून त्यांच्या उपायांवर लक्ष्य केंद्रित केल्यास खरोखर आपल्या शाळांचा दर्जा तर बदलेलच परंतु या ‘आदिवासी वादळा’मुळे भविष्यात समाजाचे होणारे नुकसान टळेल. याकार्यातून मिळणारे समाधानही आपणासच मिळेल. या समाधानासाठी आपणाकडून मला सहकार्याची अपेक्षा करतो.धन्यवाद !!!
राजू ठोकळ
शिवस्पंदन युवा
माझी संस्कृती….सह्यभ्रमंती !!!